Sinhasta Kumbh Mela Nashik Dates: सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृतस्थानांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दोन वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भातील बैठकीसाठी नाशिकमध्ये असतानाच या तारखा जाहीर झाल्या आहेत. या सिंहस्थ मेळाव्यासंदर्भात काही मतभेद असले तरी ते सोडवण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून करण्यासाठी आज बैठक पार पडत असून त्याचदरम्यान अमृतस्नानाच्या तारखा जाहीर झाल्यात.
सिंहस्थ कुंभमेळा हा खरा नाशिकचा की त्रंबकेश्वरचा याबाबत त्र्यंबकेश्वरच्या शैव संप्रदायाने सवाल उपस्थित केले होते. वैष्णव आणि शैव संप्रदायातील वाद टाळण्यासाठी प्रशासनाने आता नाशिक आणि त्रंबकेश्वर ही दोन्ही नावं टाळून केवळ सिंहस्थ कुंभमेळा 2027 असे संबोधन करणे सुरू केले आहे. या वादामुळे भाविकांच्या येण्यावर मोठा परिणाम झाला असता त्यातून श्रद्धा जाण्याची भीती होती. त्यामुळे सुवर्ण मध्य शोधत प्रशासनांन आता हा वाद सोडवला आहे. मात्र आजच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शैव साधू बैठकीत साधू महंत याबाबत काय भूमिका घेत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असं असतानाच कुंभमेळा नियोजन संदर्भात होणाऱ्या बैठकीत कुंभमेळ्यामध्ये होणाऱ्या अमृतस्नान तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
त्र्यंबकेश्वर अमृतस्नान तारीखा जाहीर झाल्या आहेत. पहिले अमृतस्नान कधी आहे? तिसरे अमृतस्नान कधी आहे पाहूयात...
पहिले अमृतस्नान - 2 ऑगस्ट 2027
द्वितीय अमृतस्नान - 31 ऑगस्ट 2027
तृतीय अमृतस्नान - 12 सप्टेंबर 2027
31 ऑक्टोबर 2026 ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात होईल.
पहिले अमृतस्नान -2 ऑगस्ट 2027
द्वितीय अमृतस्नान - 31 ऑगस्ट 2027
तृतीय अमृतस्नान - 11 सप्टेंबर 2027
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाची बैठक घेत आहेत. यामध्ये देशातील सर्वच आखाड्यांचे साधू महंत आणि प्रशासन अधिकारी उपस्थित आहेत. आजच्या बैठकीमध्ये अमृत स्नानाच्या तारखा जाहीर करण्याबरोबरच नाशिकचा कुंभमेळा 13 महिन्यांऐवजी 22 महिने असणार असल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. यामध्ये तीन मुख्य स्नान असून 25 ऐवजी 42 पर्वस्नान असतील. चर्चेमध्ये त्र्यंबकेश्वरमधील साधूंची नाराजी हा कळीचा मुद्दा असणार आहे. आजच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण पाच मुद्दे असणार आहेत.
साधू ग्रामसाठी पंधराशे एकर कायमस्वरूपी अधिग्रहित करणे.
सिंहस्थ प्राधिकरणात साधू महंतांचा सहभाग असावा अशी मागणी.
कुंभमेळ्यासाठी केंद्र व राज्याकडून अद्याप निधी जाहीर झालेला नाही त्याबाबत जाहीर करण्याची आग्रही मागणी.
नाशिक जिल्ह्यात होणारा सिंहस्थ कुंभमेळा त्रंबकेश्वरचा खरा की नाशिकचा याबाबत त्र्यंबकचा असे म्हणण्याची शैव आखाड्यांची मागणी.
गोदावरी नदी प्रदूषणाबाबतीमध्ये प्रशासनाकडून होत असलेल्या निष्काळजीपणा बाबत साधू महंतांची नाराजी.