Babajani Durrani : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दणका दिला आहे. परभणीच्या पाथरीतील भूखंड गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीची आदेश महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले आहे. पाहुयात नेमकं प्रकरण काय आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दणका दिला आहे. परभणीच्या पाथरीमधील भूखंड गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी स्थापन केली जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे. या भूखंड घोटाळ्यामध्ये बाबाजानी दुर्राणी यांचं नाव असल्याने त्यांचीही चौकशी होणार आहे. काँग्रेस आमदार साजिद पठाण यांनी विधानसभेत भूखंड घोटाळ्याचा मुद्दा मांडत कारवाईची मागणी केली होती.
काय आहे पाथरी भूखंड घोटाळा?
- पाथरी नगरपरिषदेच्या जागेवर अनधिकृत बांधकाम
- सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर चुकीच्या पद्धतीने ताबा
- सर्व्हिस रोड आणि खुल्या जागेत बाबा टॉवरची उभारणी
- गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर अनधिकृत व्यापारी संकुल
- माजी आमदार बाबाजानी दुर्राणींचं प्रकरणात नाव
- अनधिकृत टॉवरमधील गाळे भाड्याने दिल्याचा आरोप
- याआधीही एका समितीकडून या भूखंड घोटाळ्याची चौकशी
- जागेवर अनधिकृत बांधकाम असल्याचा समितीची अहवाल
- अहवालानंतरही अनधिकृत बांधकामावर कारवाई नाही
बाबाजानी दुर्राणी पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात
बाबाजानी दुर्राणी आणि त्यांच्या टीमकडून पाथरीमध्ये मोठ्या प्रमाणावर भूखंड घोटाळा झाल्याची माहिती ही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. एसआयटी स्थापन करून अनधिकृत बाबा टॉवरसह इतर गैरव्यवहारांची देखील चौकशी केली जाणार असल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे.
पाथरीमधील बाबा टॉवर आणि बाबाजानी दुर्राणी यांची चौकशी व्हावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते आहे. आता साजिद पठाण यांच्या प्रश्नाची दखल घेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी एसआयटीची घोषणा केली आहे. त्यामुळे बाबाजानी दुर्राणी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.