Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सापांची भांडण आणि प्रणय पाहण्यासाठी गर्दी

लासलगाव बाजार समितीजवळ हायवेवर असलेल्या पाटील पेट्रोल पंपावरची ही दृश्यं.

सापांची भांडण आणि प्रणय पाहण्यासाठी गर्दी

नाशिक : लासलगाव बाजार समितीजवळ हायवेवर असलेल्या पाटील पेट्रोल पंपावरची ही दृश्यं. भरदिवसा धामण जातीच्या 8 ते 9 फूट लांबीच्या दोन नर सापांची लढाई... आणि त्यानंतर नर मादी धामण सापांचं मिलन. सुमारे पाच ते सहा तास सापांचा हा खेळ सुरू होता. पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या लासलगावकरांना हा थरार पाहायला मिळाला. मार्च एप्रिल हा धामण जातीच्या सापांचा मिलनाचा काल असतो. मात्र या सापाविषयी आणि त्यांच्या मिलनाविषयी अनेक गैरसमज आहेत. सापांचं मिलन पाहिल्यानं धनलाभ होतो, हा चुकीचा समज असल्याचं सर्पमित्रांनी स्पष्ट केलं.

Read More