Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ज्वारीच्या कणसावर नागोबा डुलाया लागला, Video Viral

 सध्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतकरी पुन्हा शेतात काम करु लागला आहे. या दरम्यान ज्वारीच्या शेतात एका नागाच दर्शन झालं आहे. पाहा व्हिडीओ 

ज्वारीच्या कणसावर नागोबा डुलाया लागला, Video Viral

महाराष्ट्रात पावसाचं आगमन पंधरा दिवस आधीच झालं. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान तर झालंच पण याकाळात शेतीची काम देखील थांबली. पण आता पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा शेतीची काम सुरु झाली आहेत. असं असतानाच अकोला जिल्ह्यातील जनुना येथील शेतकऱ्याचा शेतात चक्क साप दिसला आहे. 

सध्या ज्वारी काढणीच्या कामाला सुरुवात झाली असून अकोला जिल्ह्यातील जनुना येथील शेतकरी अनिल जामोतकर यांच्या शेतात ज्वारीची कापणी करताना सदर साप दिसून आला.  शेतकऱ्याच्या शेतात काम करत असताना अचानक ज्वारीच्या वर नाग दिसून आल्याने एकच खळबळ उडाली.. शेतकऱ्यांमधील काम सध्या जोशात असतानाच नागाच्या आगमनाने सर्वांमध्ये गोंधळ उडाला. काही क्षणांकरता सर्वजण घाबरले, परंतु नंतर नागरिकांनी एकत्र येत नागाला सुखरूपपणे शेताच्या बाहेर काढले.

ज्वारीचे कणस चांगले पिक आल्यामुळे अनेक पक्षी देखील या पिकावर बसतात. या पक्षांना भक्ष्य करण्यासाठी नाग येथे आल्याच सांगण्यात येत आहे. शेतात नागाचं दर्शन झाल्यामुळे खळबळ उडाली पण नागाचं असं रुप पाहायला मिळाल्याचा आनंद देखील व्यक्त केला. 

Read More