Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Snake : पत्नीसोबत पटत नाही म्हणून सर्पमित्राने नागाला घेतलं चुंबन अन्...

Nashik Crime : पती-पत्नीमधील वाद इतक्या टोकाला गेला की सर्पमित्राने कॅफेवरील बिल्डिंगच्या गच्चीवर जात नागासोबत...

Snake : पत्नीसोबत पटत नाही म्हणून सर्पमित्राने नागाला घेतलं चुंबन अन्...

चेतन कोळस, झी मीडिया, येवला (नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीच्या जाचाला कंटाळून एक पत्नी धक्कादायक पाऊल उचलं. सर्पमित्राने  पत्नीच्या त्रासाला कंटाळून थेट नागाचेच चुंबन घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून नागेश श्रीधर भालेराव (34) असं मृत सर्पमित्राचं नाव आहे. 

स्टंटबाजी करत संपवला जीव

नागेश हा शहरातील एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये तसंच होर्डिंग चिकटवण्याचं काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. नागेशने दोन दिवसापूर्वी स्वतःची व्हिडीओ क्लिप बनवत पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार असल्याचं त्यानं म्हटलं होतं. त्याआधी त्याने स्टँम्प पेपरवर वैवाहिक जीवनामध्ये झालेल्या फसवणुकीविषयी उल्लेख केला होता. (snake kiss man Lost Her Life  Nashik Crime nmp)

fallbacks

अखेर उचललं हे पाऊल 

पती-पत्नीमधील वाद इतक्या टोकाला गेला की सर्पमित्राने कॅफेवरील बिल्डिंगच्या गच्चीवर जात नागासोबत स्टंटबाजी करण्यास सुरुवात केली. नागाने त्याचा ओठांना आणि गालाला तीन वेळा दंश केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर मित्रांनी त्याला रुग्णालयात नेलं खरं पण उपचारांपूर्वीच त्याने प्राण सोडला होता. 

Read More