Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'आपली भेट पुन्हा नाही... मी वैकुंठावरुन...', 'तो' वारकरी 'साक्षात पांडुरंग'च? Video झाला Viral

Aashadhi Wari Viral Video: वारकऱ्यांना आषाढी वारीचे वेध सुरू झाले आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. 

'आपली भेट पुन्हा नाही... मी वैकुंठावरुन...', 'तो' वारकरी 'साक्षात पांडुरंग'च? Video झाला Viral

Aashadhi Wari Viral Video: आषाढी वारीला सुरुवात झालीये. राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरीसाठी जात आहेत. आषाढी एकादशी 6 जुलै रोजी रोजी आहे. यंदाचा वारी सोहळा 18 आणि 19 जूनला सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वीच वारकऱ्यांनी पंढरीची वाट धरली आहे. अनेक भक्तगण विठुरायाच्या पंढरीत दाखलदेखील झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. एक फोटोग्राफर इन्फ्लुअन्सर एका वृद्ध वारकऱ्यांचा फोटो काढत असताना अचानक त्यांनी म्हटलेले शब्द ऐकून नेटकऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आले. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी म्हटलं आहे की, साक्षात पांडुरंगच पुढे उभा ठाकला आहे. नक्की काय होता हा संवाद एकदा पाहाच. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एक वारकरी बाबा फोटोग्राफरला फोटो काढायला सांगतात. त्यानंतर त्यांच्यात झालेले संभाषण एकून प्रत्येकालाच भावूक व्हायला झाले. हा व्हिडिओ सागर गुप्ता नावाच्या इन्फ्लुअन्सरने काढला आहे. Filmholic Sagar नावाच्या त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सुरुवातीलाच इंद्रायणी नदीच्या काठावर बसलेल्या एका वृद्ध व्यक्तीने या इन्फ्लुअन्सरने फोटो काढण्यास सांगितले. त्यानेदेखील हो त्याचसाठी आलोय असं म्हणत त्यांचे फोटो काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर सागरने त्या वृद्ध बाबांना तुम्ही कुठले आहात असा प्रश्न केला. तेव्हा त्यांनी वैकुंठ असं उत्तर दिलं. तसंच, कट करा तुमचं काम आता आपली परत भेट नाही, असं त्यांनी म्हटलं. 

वृद्ध वारकऱ्याच्या या वाक्यानंतर सागरने त्यांना भेटणार आपण तिकडे येऊन भेटणार. त्यावर वृद्ध बाबा म्हणतात, कोण दिवस कसा येईल देह ना भरोसा नाही. परत भेट नाही आपली. परत भेटणार नाही. अहो अडचणी येतात तुम्हाला आम्हाला आषाढी वारी आली.. वाट पाहू नका, असं म्हणत ते सागरचे पायाशी झुकतात. तेव्हा सागर त्यांना थांबवतो पण ते उलट त्यालाच प्रश्न करतात का, तुमचे नाही माझ्या पांडुरंगाचे, हृदयामध्ये आहे की नाही. त्याचं दर्शन होतं तुम्ही कशाला भिता, असं म्हणतात. त्यानंतर राम कृष्ण हरी म्हणा जन्म नाही पुन्हा, असं म्हणतात. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत राम कृष्ण हरी म्हणा..हा जन्म नाही पुन्हा...त्यांचा एकेक शब्द खुप काही सांगुन जात होता..., असं म्हणत आहेत. भाऊ तू देवाला भेटलास मना राम कृष्ण हरी, अशी एकाने कमेंट केली आहे. भाई आज तुमको सच है भगवान पांडुरंग परमात्मा मिल गया आपको भी और उस बाबा को भी पांडुरंग परमात्मा क्या स्वरूप थे उनको भी कोटी कोटी प्रणाम, अशी कमेंटदेखील एकाने केली आहे. 

Read More