Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आताची मोठी बातमी! पंढरपूरमध्ये भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू

मोहोळ-पंढरपूर महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

आताची मोठी बातमी! पंढरपूरमध्ये भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू

अहमद शेख, झी मीडिया, सोलापूर : मोहोळ-पंढरपूर महामार्गावर पेनूर जवळील माळी पाटा नजीक इथं दोन कारचा भीषण अपघात झाला. संध्याकाळी 5 च्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात 6 जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

मुळचे मोहोळ इथले रहिवासी असलेल्या खान कुटुंबातील सदस्यांचा मृतांमध्ये समावेश असल्याची माहिती आहे. अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सोलापूर इथं नेण्यात आलं आहे. 

Read More