Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सोलापूरमध्ये सख्या भावाने केला भावाचा खून

सख्या भावानेच सख्या भावाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.  

सोलापूरमध्ये सख्या भावाने केला भावाचा खून

सोलापूर : येथे सख्या भावानेच सख्या भावाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. लहान भावाला वाईट मित्रांची संगत लागली होती. ही संगत सोडण्यासाठी मोठ्या भावाने लहान भावाला समजवले. मात्र, तो ऐकत नसल्याचे लक्षात येतात दोन ठेवून दिल्या होत्या. त्यानंतर भाऊ सुधारेल असे मोठ्या भावाला वाटले. मात्र, ही मारहाण करणे मोठ्या भावास महागात पडले. लहान भावाने मनात राग ठेवून मोठ्या भावाच्या डोक्यात लोखंडी बट घालून त्याचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून त्याला अटक केली आहे.

वाईट मित्रांची संगत सोड म्हणून मोठ्या भावाने वारंवार देखील सांगून संगत न सोडल्याने एके दिवशी मोठ्या भावाने लहान भावावर हात उचलला. रागाच्या भरात लहान भाऊ भाड्याने राहत असलेल्या घरातून निघून गेला. मात्र मनात राग धरून लहान भाऊ पुन्हा रात्री घरी आला. यावेळी त्यांनी मोठ्या भावाचा खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लोखंडी बट घालून पळण्याचा प्रयत्न केला. लहान भाऊ राकेश बनसोडे (२३) याने मोठा भाऊ रोहित बनसोडे (२५) याला जीवे मारले. रात्री रोहितचा मित्र झोपण्यासाठी घरी आला असता हा प्रकार उघडकीस आला. रोहितच्या मित्राने सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून सायकल पळून चाललेल्या राकेश बनसोडे याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करण्यात आले असून अधिक चौकशी सुरु असल्याची माहिती सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी माहिती दिली.

Read More