Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कारवाई टाळण्यासाठी मागितली एक लाखांची लाच; सोलापुरात PSI ला अटक

Solapur Crime : सोलापुरात प्रतिबंधित कारवाई टाळण्यासाठी एका पीएसआयने एक लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एसीबीने आता पीएसआयला अटक केली आहे.

कारवाई टाळण्यासाठी मागितली एक लाखांची लाच; सोलापुरात PSI ला अटक

अभिषेक अडेप्पा, झी मीडिया, सोलापूर :  सोलापूर शहरात एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तत्कालीन पोलीस निरीक्षकांच्या संमतीने दोन लाखांची लाचेची मागणी करत एक लाख रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी पोलीस उपनिरीक्षकाने दर्शवली होती. याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

एका व्यक्तीवर ॲट्रॉसिटी आणि इतर गुन्हे दाखल असताना त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तक्रारदार आणि त्यांच्या मित्राकडून लाचेची मागणी पोलीस उपनिरीक्ष विक्रम राजपूत यांनी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने याविषयी तक्रार दाखल केली होती. त्यांनतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत विक्रम राजपूत यांना अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

विक्रम राजपूत यांनी एका व्यक्तीवर दाखल केलेल्या गुन्ह्यात अनुकूल तपास करण्यासाठी आणि  प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी स्वतःसाठी आणि तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नावाने दोन लाख रूपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोड करुन एक लाख रूपयांची लाच स्वीकारण्यास संमती त्यांनी दर्शवली. याप्रकरणी फिर्याद नोंदवल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विक्रम राजपूतविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध दोन महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास विक्रम राजपूत करत होते. त्या व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी राजपूत यांनी स्वतःसाठी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या नावाने दोन लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार संबंधित व्यक्तीच्या मित्राने केली होती. त्यानंतर एसीबीने 6 ऑक्टोबर रोजी या तक्रारीची पडताळणी केली तेव्हा राजपूत यांनी एक लाख रुपयांची लाच स्विकारण्यास संमती दर्शवली होती. त्यानंतर एसीबीने राजपूत यांना अटक करुन गुन्हा दाखल केला आहे.

परभणीत विद्युत मीटर नावावर करण्यासाठी घेतली लाच

जुन्या मालकाच्या नावे असलेले विद्युत मीटर तक्रारदार असलेल्या नवीन मालकाच्या नावे करण्यासाठी महावितरणच्या 2 कर्मचाऱ्यांनी लाच मागितली होती, परभणी शहरातील महावितरणच्या उपविभागातील झोन तीन मधील दोन कर्मचाऱ्यांनी लाच मागितली होती. याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सोळाशे रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडलेत.

Read More