Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Crime Story: मुलीच्या अफेअरची कुणकुण, मुलाला घरी बोलवले अन् अडकित्यात टाकून शरीराचे तुकडे केले

Crime Story: सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी इथं जानेवारी 2013 मध्ये सचिन धारू याच्यासह तिघांचा निर्घृण खून करण्यात आला होता. 

Crime Story: मुलीच्या अफेअरची कुणकुण, मुलाला घरी बोलवले अन् अडकित्यात टाकून शरीराचे तुकडे केले

Crime Story: विसाव्या शतकातही आपल्या देशात काही अंधश्रद्धा व रुढी परंपरा पाळल्या जातात. आजही काही गावात जातव्यवस्था अस्तित्वात आहे. काही गावात आजही खाप पंचायतीचे नियम पाळले जातात. याच जातीव्यवस्थामुळं कित्येकदा गुन्हेदेखील घडतात. महाराष्ट्रात 12 वर्षांपूर्वी घडलेल्या एका हत्याकांडाने एकच खळबळ उडाली होती. काय घडलं होतं नेमकं? 

12 वर्षांपूर्वी म्हणजेच 1 जानेवारी 2013 रोजी राज्य तिहेरी हत्याकांडाने हादरले होते. प्रेमप्रकरणामुळं मुलीच्या कुटंबीयांनी मुलाला आणि त्याच्या दोन नातेवाईकांना घरी बोलवून त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. जातीव्यवस्था आणि प्रेमविवाह यामुळं तिघांचा हकनाक बळी गेला होता. या प्रकरणानंतर 6 आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली होती. 

महाराष्ट्रातील अहिल्यानगर (अहमनदनगर) जिल्ह्यातील सोनई गावात 1 जानेवारी 2013 साली तीन मुलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. जातीच्या नावाखाली नगर जिल्ह्यात घडलेले भयंकर ऑनर किलिंग होतं. ज्यामुळं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. सचिन घारू नावाच्या मुलाचे गावातील एका उच्च जातीतील मुलासोबत प्रेमप्रकरण होते. दोघांनाही लग्न करायचे होते. मात्र ही गोष्ट जेव्हा तिच्या घरच्यांना कळली तेव्हा त्यांनी मुलाची हत्या करण्यात आली.

सोनईतील पोपट दरंदले यांची मुलगी कॉलेजात शिकत असताना त्याच संस्थेत काम करणाऱ्या सचिन धारू नावाच्या मुलासोबत तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तीला दोघांच्या नात्याबद्दल माहिती मिळाली. त्याने ही माहिती तिच्या घरच्यांना सांगितली. तेव्हा या दोघांनी जर लग्न केले तर समाजात नाच्चकी होईल म्हणून तिच्या कुटुंबीयांनी सचिनला जीवे मारण्याचा कट रचला. 

आरोपी पोपट दरंदले यांनी सचिनला सेप्टिक टॅक स्वच्छ करण्याच्या बहाण्याने घरी बोलवून घेतली. सचिनसोबत त्याचे दोन नातेवाईक संदीप राजू थनवार आणि राहुल कंडारेदेखील आले होते. तिघांनी सेप्टिक टँकची स्वच्छता सुरू केली. त्याचवेळी मुलीचे वडील आणि त्यांचे भाऊ व मुलीचा भाऊ यांनी संदीपला सेप्टिक टँकमध्ये बुडवून मारले तर राहुलवर कोयत्याने वार केले व त्यांची हत्या केली. 

आरोपींनी सचिनला पकडून उस तोडण्याच्या अडकित्यात टाकून त्याच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. सचिनचे अवयव विहिरीत, बोअरवेलमध्ये त्याच्या शरीराचे तुकडे टाकण्यात आले. दुसऱ्या दिवशी विहिरीत शरीराचे तुकडे दिसल्यानंतर हे हत्याकांड उघडकीस आले होते. आरोपींनी इतर दोन आरोपींचे मृतदेह सेफ्टिक टँकमध्ये पुरले होते. 

तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी 15 फेब्रुवारी 2013 रोजी सीआयडीकडे चौकशी सुपूर्द करण्यात आली होती. त्यानंतर 25 मार्च रोजी सीआयडीने आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यात 53 साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. नाशिक न्यायालयाने सहा आरोपींना फाशीची शिक्षा ठोठाविली. त्याच दरम्यान पोपट दरंदले या आरोपीचा मृत्यू झाला. ही शिक्षा देण्यासाठी उच्च न्यायालाने शिक्षा कायम करणे आवश्यक असते. आता उच्च न्यायालयानेही सुनावणीत फाशीची शिक्षा कायम केली आहे.

Read More