Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

थर्टी फस्ट आणि न्यू ईयरसाठी गोव्याला जाण्याचा प्लान करणाऱ्या पुणेकरांसाठी रेल्वेची खास सोय

थर्टी फस्ट आणि न्यू ईयरसाठी कोकणात तसेच गोव्याला जाण्याचा प्लान करणाऱ्या पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे मार्फत एक खास ट्रेन चालवली जाणार आहे. 

थर्टी फस्ट आणि न्यू ईयरसाठी गोव्याला जाण्याचा प्लान करणाऱ्या पुणेकरांसाठी रेल्वेची खास सोय

Pune Goa Railway News : थर्टी फस्ट आणि न्यू ईयरसाठी गोव्याला जाण्याचा प्लान करणाऱ्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. सेलिब्रेशनसाठी गोव्याच जाण्याचा प्लान करणाऱ्या पुणेकरांसाठी रेल्वेने खास सोय केली आहे. पुणे ते गोवा मार्गावर विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

हे देखील वाचा... महाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्र किनारा; मुंबईपेक्षा पुण्यावरुन जास्त जवळ आहे 

नव वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर मोठ्या संख्येने गोव्याला जातात. पुण्यात मोठा आयटी हब आहे. दुसऱ्या जिल्ह्यातील तसेच पर राज्यातील तरुण मोठ्या संख्यने पुणे जिल्ह्यात नोकरी निमित्ताने वास्तव्यास आहेत. यामुळे सगळेच जण ग्रुपने गोव्याला जाण्याचा प्लान बनवतात. यामुळे  थर्टी फस्ट आणि न्यू ईयर रेल्वेला खूपच गर्दी असते. ही गर्दी विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे गोवा मार्गावर विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुणे ते करमाळी दरम्यान साप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही ट्रेन नियमित राहणार नसून फक्त एका ठाराविक कालावधीपर्यंत चालवली जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाककडून स्पष्ट करण्यात आले आहे.  पुणे ते करमाळी दरम्यान चालवल्या जाणाऱ्या या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील 17 महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा दिला जाणार आहे. यामुळे फक्त गोव्यालाच नाही तर पुण्यातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना देखील या ट्रेनने प्रवास करता येणार आहे. कारण, कोकणातील रत्नागिरी तसेच सिंधूदुर्ग जिल्ह्यातील अनेक महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर ही विशेष ट्रेन थांबवणार आहे.

पुणे ते करमाळी दरम्यान चालवण्यात येणाऱ्या या  विशेष एक्सप्रेस ट्रेन ला 17 महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. ही ट्रेन चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. 

असं आहे या विशेष ट्रेनचे वेळापत्रक

25-12-2024 ते 8-01-2025 या दरम्यान पुणे ते करमाळी ही विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. या काळात ही ट्रेन दर बुधवारी 5.10  वाजता पुणे येथून सुटेल आणि त्याच दिवशी 20.25 वाजता करमाळी येथे पोहोचणार आहे. या विशेष ट्रेनच्या एकूण सहा फेऱ्या होणार आहेत.  पुणे ते करमाळी अशा तीन आणि करमाळी ते पुणे अशा तीन म्हणजे एकूण सहा अशा या फेऱ्या होणार आहेत.

 

 

Read More