Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

औरंगाबादमध्ये एसटी चालकाला तरुणांकडून मारहाण

 चितेगाव टोलनाक्यावर अडवून काही तरुणांनी एसटी बस चालकाला बेदम मारहाण केली. 

औरंगाबादमध्ये एसटी चालकाला तरुणांकडून मारहाण

औरंगाबाद : गुरुवारी संध्याकाळी पैठणहून औरंगाबादला येताना चितेगाव टोलनाक्यावर अडवून काही तरुणांनी एसटी बस चालकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीचं कारण ऐकाल तर थक्क व्हाल. बस चालकानं बाईकस्वाराला हूल दिल्यानं बाईक चालक तरुणाला राग आला. तरूण वेगात पुढच्या टोल नाक्यावर जाऊन थांबला. तिथे त्याने मित्रांना गोळा करून बसमध्ये चढून बस चालकाला मारहाण केली. हा सगळा प्रकार चितेगाव टोल नाक्यावर घडला. नाक्यावरच्या सीसीटिव्ही कॅमेरात सारं काही कैद झालं. याप्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. 

Read More