Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ST महामंडळाचा आजपर्यंतची सर्वात जबरदस्त योजना; प्लानिंग खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या करणार

ST महामंडळाच्या बसने आता धार्मिक स्थळांची सफर करता येणार आहे. 

  ST महामंडळाचा आजपर्यंतची सर्वात जबरदस्त योजना; प्लानिंग खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या करणार

Maharashtra State Road Transport Corporation : महाराष्ट्र राज्य ST महामंडळाची आजपर्यंतची सर्वात जबरदस्त योजना आखली आहे. सर्वसमान्यांना आता धार्मिक पर्यटनस्थळांचे दर्शन घेता येणार आहे. विशेष म्हणजे याचे प्लानिंग  खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या करणार आहेत. अत्यंत कमी खर्चात या सहलींचे आयोजन केले जाणार आहे. 

परिवहन विभागाने सर्वसामान्य प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.  सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात यासाठी  खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी सोबत संयुक्तपणे सहली आयोजित करणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांना कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.  कमी गर्दीच्या दिवसात सहलीचे आयोजन केले जाणार आहे. 

डायरेक्ट शाळेत पास मिळणार

शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थ्यांना एसटीचे पास थेट त्यांच्या शाळेतच वितरित करण्यात येणार आहेत. अशा सूचना परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला केली. दरम्यान, एसटीकडून विद्यार्थ्यांना प्रवास भाड्यात ६६.६६ टक्के सवलत दिली जाते. म्हणजेच विद्यार्थ्यांना केवळ ३३.३३ टक्के शुल्क भरून मासिक पास मिळतो. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना अंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना एसटी पास मोफत दिला जातो.

एसटी महामंडळातंर्गत 5 प्रादेशिक विभागांची निर्मिती

एसटी महामंडळातंर्गत 5 प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे.  मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती आणि नागपूर असे 5 प्रादेशिक विभाग तयार करण्यात आले आहेत. कर्नाटक परिवहन महामंडळाच्या धर्तीवर महाराष्ट्र एसटी महामंडळातंर्गतही 5 प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे. नियंत्रण, नियोजन आणि समन्वयासाठी 5 प्रादेशिक विभागांची रचना केली गेली आहे. 

Read More