वर्ध्यात विद्यार्थ्यांनी चक्क एसटी आगारातच शाळा भरवली. वर्ध्याच्या तळेगाव एसटी आगारात ही शाळा भरली. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून गावात एसटी येत नसल्यानं विद्यार्थी आणि पालक संतापलेत.
वर्ध्यात विद्यार्थ्यांनी एसटी आगारातच भरवली शाळा
4-5 महिन्यांपासून एसटी गावात येत नसल्यानं संताप
वर्ध्याच्या एसटी डेपोमध्ये शाळा भरवत विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलाय. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून गावात एसटी येत नसल्यानं विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले होते. गावात एसटी येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाहीये. वर्धा डेपोत वारंवार निवेदन देऊनही एसटी सुरू न केल्यामुळे विद्यार्थ्यांनी थेट एसटी डेपोमध्येच शाळा भरवली.
गावात एक महिन्यापासून पारडी-तळेगांवात बस फिरकली नाही. आगार प्रमुखाला याबाबत विचारले असता पारडी गावाच्या रस्त्याचे काम सुरू आहे. तसंच पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले असल्यामुळे या रस्त्यावरून एसटी जाऊ शकत नाही. त्यामुळे पर्यायी रस्त्यावरून बस सुरू असल्याची माहिती वर्धा एसटी डेपोकडून देण्यात आलीय.
गावात बस येत नाही म्हणून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय. निवेदन देऊनही विद्यार्थ्यांकडे कुणाचं लक्ष नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी थेट डेपोत शाळा भरवली. त्यामुळे आता तरी विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन त्यांची शाळेत जाण्याची व्यवस्था करण्यात यावी. एवढीच माफक अपेक्षा या विद्यार्थ्याची आहे.