Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारने लोकांचा विश्वासघात केला - फडणवीस

विज बिल सवलत नाकारल्याने सरकारवर फडणवीसांची टीका

वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारने लोकांचा विश्वासघात केला - फडणवीस

मुंबई : 'लॉकडाऊनमध्ये आलेली वीज बिल यात सवलत देऊ असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले होते, मात्र यावर त्यांनी लोकांचा विश्वासघात केला.' राज्य सरकारची भूमिका लोकविरोधी असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत केली आहे. 

'हे सरकार घोषणा करते व त्यावर पलटते, लॉकडाऊन मध्ये सवलत देऊ या घोषणा वारंवार सरकारने केल्या तीन कॅबिनेट मंत्र्यांनी घोषणा केली होती. आता म्हणतात अभ्यास झाला नाही. त्यामुळे हे सरकार लोकविरोधी आहे.' अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील सरकारला अल्टीमेटम दिला आहे. सरकारने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केल्याचा आरोप मनसेने केला होता. सोमवारपर्यंत याबाबत निर्णय घेतला नाही तर मनसेकडून आंदोलन करण्यात येईल. असा इशारा मनसेने दिला होता.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील जनतेला वीज बिल भरु नका असं म्हटलं होतं. 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्यांनी रद्द केला? असा सवालही त्यांनी केला.

वीज बिलात कोणतीही सवलत देता येणार नाही. त्यामुळे रिडींगप्रमाणे सगळ्यांना बिल भरावेच लागेल असं उर्जामंत्र्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. लोकांनी देखील सरकारच्या या युटर्ननंतर नाराजी व्यक्त केली होती.

Read More