Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

जुन्या वाहनांना 'एचएसआरपी' नंबरप्लेट बसवण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ, ही असणार शेवटची डेडलाईन

वाहनधारकांसाठी खुशखबर! जुन्हा वाहनांना 'एचएसआरपी' नंबरप्लेट बसवण्यासाठी अनेक अडचणी येत असल्यामुळे राज्य सरकारने तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. 

जुन्या वाहनांना 'एचएसआरपी' नंबरप्लेट बसवण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ, ही असणार शेवटची डेडलाईन

HSRP Number Plate : 2019 पूर्वी खरेदी केलेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा पाटी बसवण्यासाठी राज्य सरकारने 30 मार्च पर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर ही मुदत 30 एप्रिलपर्यंत देण्यात आली. यासाठी राज्य सरकारकडून तीन कंपन्यांना हे टेंडर दिले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रादेशिक परिवहन विभागात उच्च सुरक्षा पाटी बसवण्यासाठी कार आणि बाईक चालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, वाहनांची संख्या आणि वाहनधारकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे राज्य सरकारने या पाट्या बसविण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ आता 15 ऑगस्टपर्यंत असणार आहे. 

जर आपण नवीन दिलेल्या मुदतवाढीचा विचार केला तर दररोज 3 लाख 16 हजार 71 वाहनांना पाटी बसवावी लागणार आहे. काही ठिकाणी तर दीड ते दोन महिन्यांची प्रतीक्षा वाहनचालकांना करावी लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलेल्या मुदतीमध्ये या पाट्या लावता येणार नाहीत. हे लक्षात घेऊन सरकारने मुदतवाढ दिली आहे.  मात्र, मुंबईसह इतर शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये वाहनधारकांनी अजूनही पाट्या लावल्याचं दिसून येत नाही. शासनाने या आधी देखील दोन वेळा मुदतवाढ दिली होती. परंतु अजूनही काही वाहनधारक नंबर प्लेट बसवत नसल्याचं दिसून येत आहे. 

HSRP म्हणजे काय?

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही खास प्रकारची नंबर प्लेट आहे. जी बनावट नंबर प्लेट्स व वाहन चोरी रोखण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे 1 एप्रिल 2019 पूर्वी विकली गेलेली सर्व वाहने ज्यामध्ये दुचाकी, चारचाकीसह इतर सर्व वाहनांना ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे. 

सरकारने दिलेल्या मुदतीनंतर जर वाहनावर HSRP नंबर प्लेट नसेल तर त्या वाहनधारकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर वाहनधारकांनी आपल्या वाहनांवर ही नंबर  प्लेट बसवावी असं आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात येत आहे. 

महाराष्ट्रासह इतर राज्यात किती दर? 

यामध्ये दुचाकीसाठी इतर राज्यामध्ये जीएसटी वगळून 420 ते 480 रुपये इतका दर आहे. तर राज्यात हाच दर 450 रुपये इतका आहे. तीनचाकी वाहनांसाठी इतर राज्यात 450 ते 550 इतका दर आहे तर महाराष्ट्रात हाच दर 500 रुपये इतका आहे. चारचाकी वाहनासाठी इतर राज्यांमध्ये 690 ते 800 रुपये इतका दर आहे. हाच दर महाराष्ट्रात जीएटसी वगळून 745 रुपये इतका आहे. 

Read More