Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

जुन्नरमध्ये एका रात्रीत एकाच रांगेतील आठ दुकांनावर दरोडा

आठ दुकांनावर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा पडल्याची घटना घडली आहे.

जुन्नरमध्ये एका रात्रीत एकाच रांगेतील आठ दुकांनावर दरोडा

हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावातील बाजारपेठतील आठ दुकांनावर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा पडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमुळे भीतीचं वातावरण आहे. पिंपरी पेंढार हे गाव नगर-कल्याण महामार्गावरील मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. शेतीउपयोगी वस्तु, खते, बी बियाणे, औषधे, हार्डवेअर, किराणा अशी विविध दुकाने या गावच्या बाजारपेठेत आहेत.

पावसाळा तोंडावर असताना येखील दुकानदारांनी भरपूर माल विक्रीसाठी भरुन ठेवला होता. ही संधी साधत दरोडेखोरांनी एकाच रांगेतील आठ दुकानं फोडली. सध्या पोलीस पंचनामा सुरु असून पोलीस अज्ञात दरोडेखोरांचा तपास करत आहेत.

Read More