Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत अत्यंत महत्वाची बातमी

SSC and HSC Exam : राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळा आणि महाविद्यालयात परीक्षा केंद्र मिळण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी तसे संकेत दिले आहेत. 

राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत अत्यंत महत्वाची बातमी

मुंबई : SSC and HSC Exam : राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षांसाठी (10th,12th state board exams) यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळा आणि महाविद्यालयात परीक्षा केंद्र मिळण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी तसे संकेत दिले आहेत. शिक्षकांसोबत आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी हे संकेत दिले. ऑफलाईन परीक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजूनही काही शंका असल्यास शिक्षकांनी त्यांच्या शंकांचे निरसन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

विद्यार्थ्यांसाठी सराव प्रश्नावली

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा लेखन सराव व्हावा. तसेच त्यांना परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा अंदाज यावा, यासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नावली उपलब्ध करण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडून (SCERT) ही प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. 'एससीईआरटी'च्या वेबसाइटवर ती मोफत उपलब्ध केली जाणार आहे. http://www.maa.ac.in या संकेतस्थळावर विषयाप्रमाणे प्रश्नावली अपलोड करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना खास मार्गदर्शन

कोरोना काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास झाले आहेत. काही ठिकाणी ऑफलाईन वर्ग झालेत. मात्र, अनेक विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते. वार्षिक परीक्षेला सामोरे जाताना येणाऱ्या ताण तणावासाठी मार्गदर्शन आणि समुदेशन करण्यासाठी @scertmaha तर्फे प्रशिक्षित मार्गदर्शक आणि समुपदेशकांची सल्ला, मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

त्यासाठी प्रशिक्षित मार्गदर्शक आणि समुपदेशकांची यादी https://maa.ac.in/index.php?tcf=counselors_list या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सुविधेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More