Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

५ हजार सहकारी संस्था आर्थिक दृष्या सक्षम करणार-देशमुख

राज्यातील डबघाईला आलेल्या 850 विविध कार्यकारी संस्था राज्य सरकारच्या अनुदानातून नाही, तर सरकारच्या प्रोत्साहनातून पुढे आल्या आहेत.

५ हजार सहकारी संस्था आर्थिक दृष्या सक्षम करणार-देशमुख

सोलापूर : राज्यातील डबघाईला आलेल्या 850 विविध कार्यकारी संस्था राज्य सरकारच्या अनुदानातून नाही, तर सरकारच्या प्रोत्साहनातून पुढे आल्या आहेत. तर येत्या वर्षात ५ हजार सहकारी संस्था आर्थिक दृष्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याची घोषणा राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली आहे.

सुभाष देशमुख हे सोलापूमध्ये आयोजित महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेच्या सहकार परिषदेत बोलत होते. सहकार क्षेत्र सक्षम झाल्याशिवाय राज्य सक्षम होणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी जाणले आहे, येत्या वर्षात मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यांने पाच हजार सहाकरी संस्था अर्थिक सक्षम करण्याचे उद्दिष्ठ ठेवल्याचे सहकार मंत्री यांनी सांगितलं.

Read More