Sudhakar Badgujar: पक्षविरोधी कार्य केल्याबद्दल शिवसेनेचे उपघटनेते सुधाकर बडगुजर यांना पक्षातून हकलपट्टी करण्यात आली आहे. सुधाकर बडगुजर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या नाशिक शहरातून बाहेर असल्याचा सांगण्यात येत होते. सुधाकर बडगुजर आऊट ऑफ रेंज होते. मात्र सुधाकर वडगुजर यांच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळतेय. दरम्यान आज घडलेल्या सर्व प्रकारावर सुधाकर बडगुजर यांनी आपली भूमिका मांडली आहे. काय म्हणाले बडगुजर? सविस्तर जाणून घेऊया.
प्रवासात असतांना मला माहिती मिळाली. खरं बोलणं, आणि नाराजी व्यक्त करणे तर तो मी गुन्हा केलेला आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. यापूर्वी माझ्यावर हकालपट्टीची कारवाई झाली नव्हती. पहिल्यांदाच कारवाई झाल्याचे सुधाकर बडगुजर म्हणाले.
निर्णय झाल्यानंतर माझ्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. पक्षाच्या विरोधात मी काम केलं असेल तर दाखवावे. विलास शिंदेंच्या कार्यक्रमाला सगळे गेले. मी गिरीश महाजन यांच्या शेजारी उभा राहिलो म्हणून फोटो आला. त्यामुळे कारवाई केली. महाजन होते तेव्हा अरविंद सावंत होते, प्रमुख नेते होते त्यांनी बोलायला पाहिजे होते. गिरीश महाजन काय बोलले आम्हाला माहिती नाही. लग्नात कोणी राजकीय बोलत नाही.केलेल्या कारवाईवर मी नाराज नाही. मी पक्षविरोधी काय काम केलं हे दाखवा. कोरोना काळात काम केलं, रक्तदान शिबिर घेतले, शाखा उद्घाटन केलं. कार्यालयात काम केलं, संघटना बांधणीसाठी काम केलेले असतांना कारवाइ केल्याचे बडगुजर म्हणाले. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यामुळे पक्षात वादळ निर्माण झाले. अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. याबद्दल पक्षाच्या नेतृत्वाला मी ते सांगितले होते. आज मी पत्रकार परिषदेला नव्हतो हेदेखील मी सांगितले होते. बडगुजर हा पक्ष नाही ते बरोबर बोलले. मी संघटनेला बाधा येईल असे वाक्य दाखवलं तर संन्यास घेईन, असेही यावेळी ते म्हणाले.
संजय राउतांनी मेसेज केला आणि मीपण त्यांना रिप्लाय केला.माझी हकालपट्टी केली ठीक पण शिवसैनिकांना कळू द्या. काल माझ्याशी उद्धव ठाकरे, संजय राऊत बोलले. त्याचे माझ्याकडे रेकॉर्ड आहे. मी दाखवलं तर वेगळं होईल. पण मी ते दाखवणार नाही. राऊत यांच्यासोबत माझे ऋणानुबंध आहेत. मुख्यमंत्री यांना भेटून मी चूक केली नाही पण राऊत यांच्या मनात भीती आली. कटकारस्थान कुठं झालं माहिती नाही. निर्णय घ्यायचा होता तो त्यांनी घेतला. ठाकरे कुटुंब एकदा निर्णय घेतला की मागे घेत नाही आणि मागे घेऊही नये असे मला वाटतं. पत्रकार परिषदेला नव्हतो म्हणून माझी हकालपट्टी झाल्याचे ते म्हणाले.
सीमा हिरेंनी थयथयाट करण्याचे कारण नाही. वादळ येण्यापूर्वी लाटा मोजायचे कारण नाही. अन्याय झाला आहे तो जनतेसमोर यावा. मी गटबाजी मोडीत काढलेली होती. मला माझा मानसन्मान मिळत होता. पक्षात माझा कुणी अनादर केला नाही. त्यामुळे कारवाई केली याची खंत आहे. ज्यावेळेस डी जी सूर्यवंशी नेमणूक झाली तेव्हा विलास शिंदे नाराज होते. विलास शिंदेंला जिल्हाप्रमुख करायला पाहिजे होते हे डिजीला मान्य होते. शहरप्रमुख डिजीला द्यायला पाहिजे होते. विलास शिंदे नाराज यांच्यात तथ्य असल्याचे ते म्हणाले.
मला सांगितलं असतं तर मी राजीनामा दिला असता. हकालपट्टी करून माझी बदनामी केली. मला जवळ बोलून सांगायला हवे होते. अचानक निर्णय घेतला. उपनेते पद मी मागितले नव्हते. मी फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो. बंद दाराआड चर्चा केली नाही. आता सर्वांशी बोलून मी निर्णय घेईन. तुमच्याशी बोलून रिलॅक्स झालोय. शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका मांडावी. जेव्हा विश्लेषण करायच तेव्हा करेन, असेही ते यावेळी म्हणाले.