Sudhir Mungantiwar: भाजपची वर्धात सेवाग्राममध्ये मंथन बैठकी झाली. भाजपचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते.मात्र भाजपच्या या मंथन बैठकीला ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दांडी मारल्याचा पाहायला मिळालं.यामुळे सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीची चर्चा पुन्हा एकदा जोरदार सुरू झालीय.
मंत्रिमडळात स्थान न मिळाल्यानं भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार 2024 ला सत्तास्थापनेपासून नाराज आहेत. त्यांची नाराजी ते जाहीररित्या अनेकदा बोलूनही दाखवत असतात. आता मुनगंटीवारांच्या नाराजीची चर्चा पून्हा एकदा सुरू झालीय. याचं झालं असं की भाजपची वर्धाच्या सेवाग्राममध्ये मंथन बैठक झाली.भाजपचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते.
मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंथन बैठकीला दांडी मारल्याने पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीची जोरदार चर्चा सुरू झालीय. विशेष म्हणजे मागील आठवडाभरापासून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार.विधानसभेचं अध्यक्षपद दिलं जाणार अशा चर्चा सुरू आहेत. असं असताना त्यांनी भाजपच्या महत्त्वाच्या बैठकीलाच दांडी मारलीय.
तर सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावलीय. कोणीही नाराज नाहीय. पुर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते महाराष्ट्राच्या बाहेर असल्याचं कळवल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय.
2014 ला राज्यात युतीचं सरकार आल्यापासून सुधीर मुनगंटीवार यांना महत्वाची मंत्रिपदं देण्यात आली होती. मात्र 2024 ला मुनगंटीवार यांना मंत्रिपदापासून डावलण्यात आलं. त्यापासून सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत. सेवाग्राममधील भाजपच्या मंथन बैठकीला दांडी मारून मुनगंटीवार यांनी आपली नाराजी पुन्हा एकदा दाखवून दिलीय.
मराठीच्या मुद्द्यावरून सुधीर मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक झाले होते. विधीमंडळाच्या इंग्रजी कामकाज पत्रिकेवर त्यांनी आक्षेप घेत सरकारला धारेवर धरलंय. मराठी अभिजात भाषा असताना कामकाज पत्रिका इंग्रजीत का छापता? असा थेट सवालच त्यांनी विधानसभाध्यक्षांना विचारला होता. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या या आक्षेपानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काहीसं मिश्किल उत्तर दिलं. राज्यात 24 तास वाळूच्या वाहतुकीला परवानगी देण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली. यावरी सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत नाराजी व्यक्त केली. बुलेट ट्रेनपेक्षा वेगात काम करणारे मंत्रिमहोदय घरकुलांचा प्रश्न आला की पॅसेंजरपेक्षा स्लो का होतात असा सवाल करत मुनगंटीवार यांनी बावनकुळेंना टोला लगावलाय. वाळूच्या 24 तास वाहतुकीला परवानगी दिल्याची घोषणा सभागृहात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली , वाळू धोरणावर बोलत असताना देखील भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी काही लपून राहिली नाही. एवढंच काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धीवरून देखील टोला लगावला. सीएम बुलेट ट्रेन पद्धतीन काम करतात पण सामान्य लोकांना घरकूल बांधणी करताना स्लो का होतात ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.सभागृहाच्या कार्यक्रम पत्रिकेवरून तसेच मुख्यमंत्र्यांच्या कामाच्या पद्धतीवर बोलून मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहे दिल्याचे पाहायला मिळाले. तसेच त्यांची नाराजी चव्हाट्यावर आल्याचं देखील बोललं जातंय. तर सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारचे डोळे उघडलेत आता तरी सरकारने शहाणं व्हवं असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी सरकारवर निशाणा साधलाय.