Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ऊसतोड कामगारांचा बिबट्यासोबत स्टंट, बछड्यांसोबत फोटोसेशन

ऊस तोडणी कामगारांच्या मुलांचे  बछड्यांना उचलून घेत फोटोसेशन

ऊसतोड कामगारांचा बिबट्यासोबत स्टंट, बछड्यांसोबत फोटोसेशन

नाशिक : ऊसतोड कामगाराचा बिबट्यासोबतचा खतरनाक स्टंट समोर आलाय. नाशिक जिल्ह्यात कुरूडगाव शिवारात ऊस तोडणी चालू असताना बिबट्याचे बछडे ऊसतोडणी कामगाराला आढळले. या बछड्यांना ऊस तोडणी कामगारांच्या मुलांनी उचलून घेत त्यांच्यासोबत फोटोसेशन केलं. 

मोबाईलवर ही मुलं बिनधास्त बिबट्याच्या बछड्यांसोबत फोटो काढत होती. धक्कादायक म्हणजे हे सगळं सुरू असताना परिसरात बिबट्याची मादीही होती. 

फोटोसेशन झाल्यावर या बिबट्याच्या बछड्यांना पुन्हा ऊस तोडणी कामगारांनी मादीकडे सोडून दिलं. हा प्रकार सुरू असताना इतर कामगारांनीही गर्दी केली होती. 

ही गर्दी त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती. मात्र कामगारांनी वेळीच ही पिल्लं त्यांच्या आईकडे सोडून दिली. 

Read More