AI Dangerous For Childrens: ऑन डिमांड सुसाईड नोट, ऑन डिमांड दारु पार्टी आणि ड्रग्सची सोय. चकीत होऊ नका. कारण आता हे सगळं होतंय AI ChatGPTवर आणि तुमची मुलं याच्या जाळ्यात सापडतायत. तुमची मुलं सातत्यानं मोबाईलवर बिझी आहेत, तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवा. गरज पडल्यास त्यांना प्रश्न विचारा. कारण मोबाईल मुलांसाठी जीवघेणा ठरु लागलाय. मोबाईल हा तुमच्या मुलांसाठी आत्मघाती ठरतोय. एआय याचं कारण ठरतंय.
चॅट जीपीटी मुलांना आत्महत्येचे विविध प्रकार सांगत असल्याची धक्कादायक बाब एका अभ्यासातून समोर आलीय. चॅट जीपीटी असे कारनामे करत असल्याचं सेंटर फॉर काऊंटरिंग डिजिटल हेल्थ अर्थात CCDHच्या एका अहवालातून उघड झालंय. जे किशोरवयीन आणि युवा पीढीसाठी धोकादायक आहे. जीवघेणं आहे.
त्याचं झालं असं की एका संशोधकानं 13 वर्षीय मुलीचं चॅट-जीपीटीवर प्रोफाईल बनवलं. त्यानं अनेक गंभीर प्रश्न चॅट-जीपीटीला विचारले. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा चॅट-जीपीटीनं संशोधकाला आई वडिलाचं नाव, भाऊ-बहिणींचं नाव आणि मित्रांचंही नाव अशा तीन वेगवेगळ्या सुसाईड नोट लिहून दिल्या.
इतकंच नाही तर चॅट-जीपीटीनं माहिती मागितल्यानंतर दारु पार्टी आणि ड्रग्जच्या व्यवस्थेबाबतही सविस्तर उत्तर दिलं. हा फार गंभीर धोका आहे.कारण एआय टूल्स वापर दिवसेंदिवस वाढत चाललाय. यूजर्स एआयच्या आहारी जाऊ लागलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण एआय तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा शॉर्टकट देत आहे.
काही दिवसांपूर्वीच अस्तित्वात आलेल्या चॅट-जीपीटीचा वापर जगातील 10 टक्के लोकांकडून करण्यात येऊ लागलाय. अमेरिकेत ही संख्या 70 टक्क्यांवर पोहोचलीय. अशा एआय टूल्सच्या जाळ्यात किशोरवयीन मुलं अडकत चाललीत.आव्हान फार गंभीर आहे.मात्र तुमच्या मुलांना एआयच्या अशा अतिशय धोकादायक गोष्टींपासून वाचवणं काळाची गरज आहे.
चॅटजीपीटी हे एक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) टूल आहे, जे माहिती आणि सल्ला देण्यासाठी वापरले जाते. मुलं हे टूल शैक्षणिक कामांसाठी किंवा मनोरंजनासाठी मोबाईलवर वापरत आहेत.
होय, एका अभ्यासानुसार चॅटजीपीटी मुलांना आत्महत्या, दारू-ड्रग्ज आणि खाण्याच्या विकृतींबाबत धोकादायक सल्ला देत आहे, जे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
संशोधकांनी 13 वर्षीय मुलीच्या प्रोफाइलने चॅटजीपीटीला प्रश्न विचारले असता, त्याने पालक, भाऊ-बहिणी आणि मित्रांसाठी तीन वेगवेगळ्या आत्महत्येच्या नोटा तयार केल्या, जे धक्कादायक आहे.
चॅटजीपीटीने दारू पार्टी, ड्रग्जच्या वापराचे सविस्तर प्लॅन आणि अन्न सेवन कमी करणाऱ्या योजना सांगितल्या आहेत, जे मुलांसाठी जीवघेणे ठरू शकते.
सेंटर फॉर काऊंटरिंग डिजिटल हेट (CCDH) या संस्थेने केलेल्या अभ्यासातून हे धोकादायक परिणाम समोर आले आहेत, ज्यामध्ये 1,200 पैकी अर्ध्याहून अधिक उत्तरं घातक असल्याचे निदर्शनास आले.
जगातील सुमारे 10% लोक आणि अमेरिकेत 70% किशोरवयीन चॅटजीपीटीचा वापर करत आहेत, ज्यामुळे त्याचा प्रभाव वाढला आहे.
मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवा, त्यांच्याशी उघडपणे संवाद साधा, आणि गरज पडल्यास मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
जर मुलं गूढ किंवा चिंताजनक गोष्टी मोबाईलवर करत असतील, तर त्यांचे चॅट इतिहास तपासा आणि संशयास्पद वर्तनाबाबत जागरूक राहा.
नाही, पण मुलांना मार्गदर्शन करून आणि मर्यादा घालूनच त्याचा वापर करू द्यावा, जेणेकरून तो धोकादायक होणार नाही.