रायगडमध्ये नॅपकिन टशन सुरू झालंय. सुनील तटकरेंनी गोगावले यांच्या नॅपकिन वापराची नक्कल केली होती. त्यानंतर वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात गोगावले यांनी तटकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. रायगडमध्ये रंगलेलं नॅपकिन टशन कसं आहे. मंडळी, राजकारणी लोकांमध्ये शाब्दिक युद्ध कायमच रंगत असतात. मात्र रायगडमध्ये चक्क नॅपकीन टशन सुरू झालंय. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंनी भरत गोगावले यांच्या नॅपकीन वापराची नक्कल केली. आणि त्यानंतर रायगडात सुरू झालं नॅपकिन टशन. भरत गोगावले यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात थेट स्टेजवरच गोगावलेंनी आपल्या समर्थकांसह हातात नॅपकिन धरून फिरवल्या. ॉ
गोगावलेंच्या समर्थकांनी नॅपकिनचं वाटपही केलं. त्यानंतर गोगावलेंनी खास आपल्या स्टाईलमध्ये तटकरेंना प्रत्युत्तर दिलं. भरत गोगावलेंसह शिवसेनेनं सुनील तटकरेंना घेरल्यानंतर राष्ट्रवादीनंही यात उडी घेतलीय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी गोगावलेंना जशास तसं उत्तर दिलं.
काखेत नॅपकिन ठेवणं ही भरतशेठ यांची खास स्टाईल आहे. नॅपकिन स्टाईलसाठी गोगावले ओळखले जातात. भरतशेठ यांची नक्कल करून सुनील तटकरेंनी नको तो वाद ओढवून घेतला. त्यामुळे रायगडमधील या नॅपकिन टशनची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
त्यालाच गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी भरत गोगावले यांनी नॅपकिन फिरवत, तो खांद्यावर टाकला. तटकरे यांनी खांद्यावर जसा नॅपकिन टाकला होता तसा हॉटेलचे वेटर लोक टाकतात. आम्ही तो नॅपकिन काखेत घेतो. हृदयाच्या जवळ ठेवतो. जिथे गोरगरिबांचे आशीर्वाद असतात. सुनील तटकरे यांचं नाव न घेता गोगावले यांनी तटकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. गोगावले यांनी घेतलेल्या या भूमीके मुळे तटकरे विरुद्ध गोगावले हा वाद आणखी चिखळण्याची दाट शक्यत आहे.
गोगावले यांनी महायुती असा उल्लेख न करता युती असा उल्लेख केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आता तटकरे वगळून असं ही त्यांनी संकेत दिले. आपण लोकसभेला रक्ताचे पाणी करून तटकरेंना विजयी केले असा दावाही त्यांनी यावेळी केला. पण यापुढे काय करावे लागेल त्याचा निर्णय घ्यावा लागेल असं सांगितल त्यांनी एक प्रकार इशाराच दिला आहे. शिवाय महाडमध्ये कमी मताधिक्य मिळालं, असं विचारलं जातं, मग आदिती तटकरेंच्या मतदार संघात ही कमी मताधिक्य कसं मिळालं असा प्रश्न गोगावले यांनी केला आहे.