Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सुरेश धस बीडमधील खोक्याच्या घरी दाखल; गुन्हेगार खोक्याच्या घरी सुरेश धस का गेले?

 भाजपा आमदार सुरेश धस सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या घरी दाखल झाले आहेत.  सुरेश धस यांना पाहताच भोसले कुटुंबाने आक्रोश केला. 

सुरेश धस बीडमधील खोक्याच्या घरी दाखल;  गुन्हेगार खोक्याच्या घरी सुरेश धस का गेले?

Satish Bhosale Beed :  बीडच्या शिरूरमध्ये मारहाण प्रकरणात फरार असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. खोक्या याच्या अटकेनंतर 13 मार्च रोजी खोक्याच्या व्हाईट हाऊसवर बुलडोझर फिरवण्यात आला. खोक्याने वन विभागाच्या जमिनीवर बेकायदा घर बांधले होते. वन विभागाने धडक कारवाईकरत हे घर जमिनदोस्त केले आहे. यानंतर  भाजप आमदार सुरेश धस हे सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी दाखल झाले आहेत. खोक्या हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. 

खोक्याच्या बेकायदा घराची सुरेश धसांना काळजी?  गुन्हेगार खोक्याच्या घरी सुरेश धस कशासाठी गेले? सुरेश धसांना खोक्याचा पुळका कशासाठी?वनविभागानं बेकायदा घर पाडलं तर त्यात चुकलं काय? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

कोण आहे खोक्या?

सतीश भोसले उर्फ खोक्या सोशल मीडियावर रिल्सच्या माध्यमातून मोठी शोबाजीही करत होता. नोटांची बंडलं उडवणं, हेलिकॉप्टमधून स्टायलिस्ट एन्ट्री करणं, फाईव्ह स्टार हॉटेलमधील शोबाजी, लग्नात नोटा उधळणं अशी रिल्स बनवत खोक्या शिरूरमध्ये हवा करत होता  मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर खोक्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या कुंडलीचाच झी 24 तासने शोध घेतला.  फरार असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर पोलिसांनी अटक केली. उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमधून पोलिसांनी खोक्याच्या मुसक्या आवळलेत. मागील सहा दिवसांपासून शिरूर पोलिसांची पथकं खोक्याच्या मागावर होती. शिरूर पोलिस ठाण्यात मारहाणीचे गुन्हे दाखल झाल्यापासून खोक्या फरार होता.

Read More