Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

असा आततायीपणा करु नका, जीवावर बेतेल !

पोहोण्यासाठी झाडावरून तळ्यात उडी मारण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला स्टंट चांगलाच महागात पडला आहे.  

असा आततायीपणा करु नका, जीवावर बेतेल !

रत्नागिरी : पोहोण्यासाठी झाडावरून तळ्यात उडी मारण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला स्टंट चांगलाच महागात पडला आहे. रत्नागिरीतल्या तेली आळी येथील तलावाजवळ ही घटना घडली असून हा तरुण जखमी झाला आहे. त्याच्या कंबरेला जोरदार दुखापत झाली आहे.

रत्नागिरीमधील तलावात पोहोण्यासाठी अनेक तरुण जात असतात. मात्र अनेक जण इथे असलेल्या झाडावरून या तळ्यात उडी मारण्याचा अती उत्साह करतात. हाच अती उत्साह या तरुणाच्या अंगलट आला. उडी मारण्यासाठी हा तरुण झाडावर चढला खरा मात्र, पावसामुळे शेवाळ पकडल्याने तरुणाचा पाय झाडावरून सटकला आणि पायाखाली असलेली फांदीही तुटली. ही फांदी तुटल्यामुळे तरुण खाली कोसळला. 

मात्र तळ्यात पडण्याऐवजी तो तळ्याच्या कठड्यावरच पडला. त्यामुळे या तरुणाच्या कंबरेला दुखापत झाली आहे. याच सगळे चित्रण एका तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केले. त्यामुळे या तरुणाच्या हा स्टंट चांगलाच अंगलट आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read More