Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ताडोबाच्या 'माया'नं असा साजरा केला मातृदिन!

आज संपूर्ण जग मातृदिन साजरा करत असताना ताडोबाच्या जंगलातही मातृदिनाचा हाच गौरव पाहायला मिळाला.

ताडोबाच्या 'माया'नं असा साजरा केला मातृदिन!

ताडोबा : आज संपूर्ण जग मातृदिन साजरा करत असताना ताडोबाच्या जंगलातही मातृदिनाचा हाच गौरव पाहायला मिळाला. माया वाघिणीचे आपल्या बछड्यांसोबत ममतापूर्ण काही क्षण समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाले आहेत. ताडोबात व्याघ्र पर्यटनासाठी आलेल्या काही पर्यटकांनी हे नेमके क्षण टिपले आहेत. प्रकल्पातल्या पांढरपौनी भागात एका पाणवठ्याशेजारी विश्रांती घेत माया वाघीण पहुडली आहे. त्याचवेळी माया वाघीण आपल्या बछड्याला चाटत त्याच्यावर लडिवाळपणे माया करत असल्याची ही दृश्यं आहेत. माया वाघीणीचे हे मायाळू क्षण तिच्यातल्या निसर्गदत्त मातृत्वाचं दर्शन घडवणारे असेच आहेत. 

 

Read More