Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

समोरुन आला पट्टेदार वाघ, पर्यटक गाड्या थांबवून खाली उतरले; ताडोबामध्ये हुल्लडबाजी

Tadoba Tourists:  ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघ दिसताच काही पर्यटक थेट गाड्यांमधून उतरुन खाली आले 

समोरुन आला पट्टेदार वाघ, पर्यटक गाड्या थांबवून खाली उतरले; ताडोबामध्ये हुल्लडबाजी

Tadoba Tourists: एकीकडे विदर्भात मानव आणि वाघ यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला असताना आता एक धक्कादायक बातमी चंद्रपुरात समोर आलीये.. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघ दिसताच काही पर्यटक थेट गाड्यांमधून उतरुन खाली आले आणि त्यांनी वाघाला पाहून एकच गोंधळ घातल्याचं चित्र पाहायला मिळालं.विदर्भात मानव आणि वाघ यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललाय. असं असतानाच दुस-या बाजूला चंद्रपुरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात  काही पर्यटकांची हुल्लडबाजी पहायला मिळतेय. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणा-या चंद्रपूर ते मोहर्ली मार्गावर पर्यटकांनी गोंधळ घातला.

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यांचं प्रमाण वाढतय

पट्टेदार वाघ समोरून येताना दिसला आणि वाहनचालकांनी गाड्या थांबवल्या. बरं इतक्यावरच हे सर्व थांबलं नाही तर...वाघ समोरून चालत येत असतानाच सर्वजण आपल्या गाड्यांमधून खाली उतरले आणि रस्त्यातच गोंधळ घालू लागले. एकीकडे गेले काही दिवस चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यांचं प्रमाण वाढत चाललंय. अनेकांना वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागलाय. मात्र असं असतानाही काही हुल्लडबाज वाघासमोर नको तो धाडसीपणा दाखवताना दिसताय़त. त्यामुळे वनविभागही आता अॅक्शन मोडवर आलाय. पर्यटकांवार दंडात्मक कारवाई केली जातेय.

 वनकर्मचा-यांसोबतच हुज्जत

नियम मोडणा-यांकडून वनविभाग दंड वसूल करतंय. नियम मोडणं ही चूक असूनही पर्यटक उलट वनकर्मचा-यांसोबतच हुज्जत घालतायत.अनेकांकडून सध्या राजकीय नेतेमंडळीची नावं पुढे करून दंड भरण्यास नकार दिला जातोय.वनविभागाने ताडोबात पर्यटनासाठी येणा-या पर्यटकांसाठी कठोर नियम बनवलेत. मात्र पर्यटक हे सर्व नियम पायदळी तुडवतायत.

काय सांगतात ताडोबाचे नियम?

नोंदणी केलेल्या मार्गावरच पर्यटनाची परवानगी असते. नियम मोडणा-या वाहनास पर्यटनासाठी बंदी असते.वाहन नोंदणी अॅपवरुन सुरक्षा ठेवीची रक्कम शासन जमा करावी लागते. नियम मोडल्यास प्रथम 3 हजार रुपये दंड असतो. दुस-यांदा नियम मोडल्यास 7 तर तिस-यांदा नियम मोडल्यास 10 हजार रुपये दंड असतो. वाहन आणि वन्य प्राण्यांत 10 मी. पेक्षा कमी अंतर ठेवावे लागते. वन्य प्राण्यांजवळ वाहन घेऊन गेल्यास दंड असतो. एकाच ठिकाणी 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ थांबल्यास दंड असतो. वरिष्ठ वन अधिका-यांच्या सूचनांचे पालन न केल्यास दंड ठोठावण्यात येतो. 

हुल्लडबाज पर्यटकांना आता दंडात्मक कारवाईचीही भीती राहिली नसल्याचं चित्र आहे. कारवाईनंतर पर्यटक उलट वनकर्मचा-यांच्याच अंगावर धावून जातायत.त्यामुळे अशा पर्यटकांवर कडक कारवाईची गरज आहे तरच अशा हुल्लडबाजांवप वचक बसू शकतो.

Read More