Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

टँकर - शिवशाही बस अपघात, १ ठार तर १५ प्रवासी जखमी

औरंगाबाद महामार्गावर भरधाव टँकरने शिवशाही बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झालाय.  

टँकर - शिवशाही बस अपघात, १ ठार तर १५ प्रवासी जखमी

औरंगाबाद : येथील महामार्गावर भरधाव टँकरने शिवशाही बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झालाय. तर १० ते १५ प्रवासी जखमी झालेत. नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील विंचूर येथे शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. 

पेट्रोलच्या टँकरने शिवशाही बसला धडक दिली. धडकेनंतर बस उलटली आणि या भीषण अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला. १० ते १५ जण अपघातात जखमी झाले असून जखमींना निफाड इथल्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बसमध्ये एकूण ३५ ते ४० प्रवासी होते. 

Read More