Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सोलापुरात शिक्षकी पेशाला काळिमा; दहावीच्या विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग

सोलापुरात शिक्षकी पेशाला काळिमा; दहावीच्या विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग

शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना सोलापुरात घडली. सोलापुरातल्या नामांकित खाजगी शाळेत दहावीच्या विद्यार्थिनीचा 56 वर्षीय शिक्षकानं विनयभंग केला. 19 एप्रिल ते 3 जुलैच्या दरम्यान शाळेच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडला होता. विनयभंग करणा-या शिक्षकानं धमकावल्यानं विद्यार्थिनीनं घाबरून कुणाकडेही तक्रार केली नव्हती. मात्र प्राचार्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांच्या सल्ल्यानं शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झाला. 'तू दहावीला आहेस, तुला काही ज्ञान नाही, तू काही कामाची नाहीस, आता तू चांगली सापडली आहेस, अशा प्रकारे पीडित विद्यार्थ्यांनीला शिक्षक धमकावत असल्याचं समोर आलं.

 

Read More