Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Ujjwal Nikam Interview:'कसाब मला बादशहा म्हणायचा' उज्ज्वल निकमांनी 'टू द पॉइंट'मध्ये कारणही सांगितलं

Ujjwal Nikam Interview: झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत उज्ज्वल निकमांची कसाबबाबत माहिती दिली.

Ujjwal Nikam Interview:'कसाब मला बादशहा म्हणायचा' उज्ज्वल निकमांनी 'टू द पॉइंट'मध्ये कारणही सांगितलं

Ujjwal Nikam Interview: विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकल 2024 मध्ये ते भाजपकडून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले. पण काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून पराभूत झाले. २०२५ मध्ये त्यांची राष्ट्रपतींमार्फत राज्यसभेवर नियुक्ती झाली. त्यांनी 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट, 2008 च्या मुंबई हल्ल्यातील अजमल कसाब खटला, गुलशन कुमार खून प्रकरण, प्रमोद महाजन खून प्रकरण, 2013 च्या मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरण आणि 2016 च्या कोपर्डी बलात्कार व खून प्रकरणासह अनेक हायप्रोफाइल खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून काम केले आहे. 30 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी 628आरोपींना जन्मठेप आणि 37 जणांना फाशीची शिक्षा मिळवून दिली आहे. त्यांना 2016 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आणि 2009 पासून त्यांना झेड प्लस सुरक्षा पुरवली जाते. झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत उज्ज्वल निकमांची कसाबबाबत माहिती दिली. खटल्यादरम्यान कसाब आणि माझ्यात नियमित संवाद व्हायचा असे ते म्हणाले. 

 'बादशहा नावानं हाक मारायचा'

26/11च्या दहशतवादी हल्ल्यातला आरोपी अजमल कसाब हा उज्वल निकमांना बादशहा या आदरार्थी विशेषणानं हाक मारत होता असा गौप्यस्फोट उज्वल निकमांनी केलाय. टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत उज्वल निकमांनी आरोपींसोबत होत असलेल्या संवादाबाबत माहिती दिली. खटल्याच्या निमित्तानं आरोपींशी नेहमी संवाद होत असल्याची माहिती त्यांनी दिली. अजमल कसाब हा आपल्याला बादशहा नावानं हाक मारत होता, अशी माहिती उज्ज्वल निकमांनी दिली. यानंतर त्यांनी यामागचं कारणही सांगितलं.

'सन्माननीय व्यक्तीला म्हणतात बादशहा'

पाकिस्तानातल्या पंजाब आणि पेशावर प्रांतात सन्माननीय व्यक्तीला बादशहा नावानं हाक मारतात त्यामुळं अजमल कसाब निकमांनाही त्याच विशेषणानं बोलावत असल्याचं त्यांनी सांगितलं. एका आरोपीवर जन्मठेपेचा खटला चालवत होतो त्या आरोपीनं आपल्या आजारपणाची पत्र लिहून चौकशी केल्याचीही आठवण त्यांनी सांगितलं.

कसाबला बिर्याणी?

दहशतवादी अजमल कसाबनं जेलमध्ये मटण बिर्याणी मागितली यावरुन राजकीय पक्षांनी फेक नरेटिव्ह सेट केला यात माझी काय चूक असा सवाल उज्वल निकम यांनी उपस्थित केलाय. टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत उज्वल निकमांनी कसाबच्या बिर्याणीचा किस्सा आणि त्यावरुन निर्माण झालेल्या वादावर भाष्य केलं... कसाबनं बिर्याणी मागितली असं आपण कधीच म्हटलं नाही पण पुढं तत्कालिन सरकार दहशतवाद्यांना जेलमध्ये बिर्याणी खाऊ घालतं असा प्रचार करण्यात आला. या सगळ्यात आपला कोणताही दोष नव्हता असंही निकम यांनी सांगितलं... काहींनी फेक नरेटिव्ह सेट केला तुम्ही त्यांना प्रश्न विचारा असंही त्यांनी सांगितलं.

Read More