Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'ठाकरे ब्रँड संपणार नाही' एकनाथ शिंदेंच्या जवळच्या आमदाराकडूनच समर्थन!

Thackeray Brand: ठाकरे ब्रँड संपणार नाही, असे विधान आमदार प्रताप सरनाईक यांनी केलंय.

'ठाकरे ब्रँड संपणार नाही' एकनाथ शिंदेंच्या जवळच्या आमदाराकडूनच समर्थन!

Thackeray Brand: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे ब्रँडची चर्चा आहे.  एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोठा गट बाहेर पडल्यानंतर आता ठाकरे ब्रॅड संपल्याची चर्चा सुरु झाली. एकानाथ शिंदे यांनाच शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले. ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला "शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)" हे नवे नाव आणि मशाल हे चिन्ह स्वीकारावे लागले. यामुळे ठाकरे ब्रँड कमकुवत होईल, अशी चर्चा सुरु झाली. पण आता एकनाथ शिंदेंच्या आमदारानेच यावर भाष्य केलंय. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरु झाल्यायत. ठाकरे ब्रँड संपणार नाही, असे विधान आमदार प्रताप सरनाईक यांनी केलंय. ठाकरे म्हणजे फक्त उद्धव ठाकरे नाहीत. त्यात राज ठाकरे व संपूर्ण कुटुंब असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक धाराशिवमध्ये म्हणाले. ठाकरे ब्रँड संपवण्याच्या आरोपावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रताप सरनाईक यांनी ठाकरे ब्रँडचे समर्थन केले.

'तूर्तास हिंदी सक्तीची नाही'

मीरा रोड येथील सभेत राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीवरुन महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. यावरही सरनाईकांनी स्पष्टीकरण दिलं. राज ठाकरे यांनी राज्य सरकारला चॅलेंज दिलेलं नाही ते चॅलेंज त्यांनी हिंदी सक्ती करणाराला दिले आहे तूर्तास हिंदी सक्तीची नाही, म्हणत प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला समर्थन दिले.

फडणवीसांच्या विधानाचे समर्थन 

समितीच्या अहवालानंतर हिंदी सक्तीचा निर्णय घेतला जाईल असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. या वक्तव्याला प्रताप सरनाईक यांनी अप्रत्यक्षरीत्या समर्थन दिले. प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा हिंदी मराठी सवाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

ठाकरेंच्या मुलाखतीवर टीका 

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलखात कौटुंबिक मुलाखत होती, असे म्हणत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर टीका केली. प्रश्न विचारणारे तेच उत्तर देणारे तेच ते सगळं ठरवून विचारलं जातं त्यामुळे न बोललेलं बरं, असं ते म्हणाले. 

कुठून सुरु झाली चर्चा?

ठाकरे ब्रॅण्ड जिवंत असला तरी तो बाजारात चालत नाही. बाजारात अनेक ब्रॅड असतात. प्रत्येक ब्रॅंड बाजारत चालतो असे नाही. सध्या हा ब्रॅंड बाजारात जनतेस पसंत नाही. मतदारांना आवडत नाही, असे विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते.

Read More