Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पत्नी आणि लाडक्या लेकीला संपवले, नंतर नवऱ्यानेही उचललं धक्कादायक पाऊल, कारण वाचून तुमचंही मन हळहळेल...

Ulhasnagar Crime News:  पत्नी, मुलीची हत्या करून वडिलांनी जीवन संपल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर येथे घडली आहे.

पत्नी आणि लाडक्या लेकीला संपवले, नंतर नवऱ्यानेही उचललं धक्कादायक पाऊल, कारण वाचून तुमचंही मन हळहळेल...

Ulhasnagar Crime News: उल्हासनगर येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका हसत्या-खेळत्या कुटुंबाची वाताहत झाली आहे. पत्नी, मुलीची हत्या करुन एका व्यक्तीने जीवन संपवलं आहे. उल्हासनगर कॅम्पनंबर 1 मध्ये ही घटना घडली आहे. आर्थिक विवंचनातून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे समोर आले आहे. एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पत्नी ,मुलीची हत्या करून वडिलांनी जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर कॅम्प नंबर 1 परिसरात घडलीय. आर्थिक विवेनचनातून हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे.  पवन पहुजा असं जीवन संपवलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पवन याने सुरुवातीला पत्नी नेहा आणि मुलगी रोशनीची हत्या केली त्यानंतर स्वता राहत्या घरातच जीवन संपवलं आहे. या घटनेची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. 

दरम्यान, पवन याने जीवन संपवण्यापूर्वी मोबाईलमध्ये व्हिडिओ कैद करून आपण आर्थिक विवंचनातून हे कृत्य करत असल्याचे सांगितले आहे. पवन हा सोनार गल्ली परिसरात एका दुकानात कामाला होता. गुरुवारी मध्यरात्री त्याने मुलगी,पत्नी यांची हत्या करून स्वतः जीवन संपवले आहे. या प्रकरणी आता उल्हासनगर पोलीस ठाण्यात एडीआर दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. 

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या

घरगुती वादातून पतीने पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना उल्हासनगरच्या शांतीनगर परिसरात घडली आहे. यानंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सुरेखा आनंद सूर्यवंशी असं मयत महिलेचं नाव आहे. सुरेखा आणि तिचा पती आनंद हे शांतीनगरच्या गावडे हायस्कूल भागात वास्तव्याला होते. आनंद हा व्यसनाधीन असल्याने त्यांच्यात दररोज भांडणं होत होती. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आनंद आणि त्याची पत्नी सुरेखा यांच्यात जोरदार भांडण झालं, याच रागातून आनंद याने धारधार हत्याराने सुरेखाच्या गळ्यावर गंभीर वार करून तिची हत्या केली आणि फरार झाला.

Read More