Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

माळशेज घाटातील वाहतूक आणखी दोन दिवस बंद

 घाट रस्ता बंद झाल्यानं अहमदनगचा मुंबईशी असणाऱ्या थेट संपर्कावर परिणाम झालाय.

माळशेज घाटातील वाहतूक आणखी दोन दिवस बंद

ठाणे : माळशेज घाटातली वाहतूक आणखी दोन दिवस बंद राहणार आहे. सोमवारी रात्री २ वाजता दरड कोसळल्यानं वाहतूक बंद करण्यात आलीय.. दरड हटवण्याचं काम सुरू आहे. पण मधून मधून येणाऱ्या पावसानं दरड हटवण्याच्या कामात अडथळे येत आहेत. घाट रस्ता बंद झाल्यानं अहमदनगचा मुंबईशी असणाऱ्या थेट संपर्कावर परिणाम झालाय.

दरड हटविण्यास अडथळा 

माळशेज घाटात  मंगळवारी पहाटे दरड कोसळली होती. त्यामुळे घाटातील वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला. सुरूवातीचा काही काळ अडचणीतून मार्ग काढत सुरू असलेली वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून पूर्णपणे थांबविण्यात आली. दरड कोसळल्यामुळे मार्गावर मोठे दगड आणि मातीचा ढिग साचला आहे.

महामार्ग अधिकारी  कर्मचारी तसेच महसूल कर्मचारी , पोलीस हे घटनास्थळी पोहचले दरड हटविण्याचे काम सुरू आहे. मात्र, घाटातील धुके, वारा आणि ढगाळ वातावरणामुळे कमी प्रकाश असल्याने दरड हटविण्याच्या कार्यात अडथळा येत आहे.

Read More