Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

धक्कादायक ! कळवा महापालिका रुग्णालय परिसरात अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग

Thane : ठाणे जिल्ह्यातील कळवा इथल्या महापिलाक रुग्णालय परिसरात एका अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला अवघ्या दोन तासात अटक करत बेड्या ठोकल्या आहेत. 

धक्कादायक ! कळवा महापालिका रुग्णालय परिसरात अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग

आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : कोलकातामधील आरजी कर रुग्णालयात (RG Kar Hospital) महिला डॉक्टर अत्याचार आणि खून प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले आहेत. या घटनेनंतर सरकारी रुग्णालयातील सुरक्षेचा (Security) प्रश्न ऐरणीवर असतानाच ठाणे जिल्ह्यातील कळवा इथल्या महापालिका रुग्णालय (Kalwa Municipal Hospital) परिसरात एका अल्पवयीन गतीमंद मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कळवा रुग्णालय परिसारातील गार्डनमध्ये एका अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग करण्यात आला. यानंतर आरोपी फरार झाला होता.

घटना उघडकीस आल्यानंतर कळवा पोलिसांनी (Kalwa Police) तात्काळ यंत्रणा राबवत अवघ्या दोन तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीचं नावं प्रदीप शेळके असं असून त्याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक माहितीच्या मदतीने कळवा पोलिसांनी या आरोपीला शोधून काढत, त्याला अटक केली आहे

Read More