Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ठाणे हादरले! आई आणि आजीनेच केली मुलीची हत्या; कारण ऐकून धक्काच बसेल

Thane Crime News: ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आई आणि आजीनेच चिमुकल्या मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. 

ठाणे हादरले! आई आणि आजीनेच केली मुलीची हत्या; कारण ऐकून धक्काच बसेल

Thane Crime News: ठाण्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. ठाण्यातील नौपाडा येथील गावदेवी परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाठीमागे झोपडपट्टी येथे सख्या आईने आणि आजीनेच आपल्या दिव्यांग मुलीची केली हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आजीला अटक केली असून आई फरार आहे. 

यशस्वी पवार ही जन्मतः दिव्यांग आणि गतिमंद असल्याने तिच्या मरणयातना सहन न होऊन तिच्याच आई आणि आजीने तिला गुंगीच्या गोळ्या देऊन हत्या केली. हत्येचा प्रकार 19 फेब्रुवारी रोजी घडला आहे. या प्रकरणी मुलीच्या मावस आत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

19 फेब्रुवारी रोजी दोन्ही आरोपी महिलांनी मुलीला झोपेच्या गोळ्या देऊन ठार केले. हत्या केल्यानंतर मुलीला आजी व आई एका चादरीत लपटून घेऊन जातानाचा CCTV समोर आला आहे. तिला एका चार चाकी कारमध्ये टाकून नेल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तिच्या आजीला विश्वासात घेत चौकशी केले तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला आहे. 

पीडित तरुणी ही जन्मापासूनच आजारी आणि दिव्यांग होती. मुलीला 15 फेब्रुवारीपासून जास्त त्रास होत होता. त्यामुळं तिच्या आईने 19 फेब्रुवारीला तिला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यातच तिचा मृत्यू झाल्याने 20 फेब्रुवारीला पहाटे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मुळ गावी नेऊन अंत्यसंस्कार केले. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

Read More