Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नाणार रिफायनरी प्रकल्पाबद्दल आदित्य ठाकरे यांनी दिलं हे आश्वासन, म्हणाले... स्थानिक लोकांची इच्छा

राजापूर येथे मोठ्या प्रमाणावर जमलेल्या रिफायनरी समर्थकांची आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी या नागरिकाचं म्हणणं ऐकून घेतलं.

नाणार रिफायनरी प्रकल्पाबद्दल आदित्य ठाकरे यांनी दिलं हे आश्वासन, म्हणाले... स्थानिक लोकांची इच्छा

राजापूर : सिधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाबद्दल नागरिकांना आश्वासन दिलंय. राजापूर येथे मोठ्या प्रमाणावर जमलेल्या रिफायनरी समर्थकांची आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी या नागरिकाचं म्हणणं ऐकून घेतलं.

कुठलाही प्रकल्प होत असताना तेथील स्थानिक लोक महत्त्वाची असतात. त्यांची इच्छा आणि होकार असेल तरच पुढे जाता येईल. नाणारमध्ये प्रकल्प होणार नाही, हे निश्चित आहे. हा प्रकल्प धोपेश्वरला व्हावा अशी मागणी होत आहे. परंतु, विरोध करणाऱ्यांचीही बाजू ऐकून घेतली जाईल, असे ते म्हणाले. 

समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जातील. त्यांचे म्हणणे मुख्यमंत्री यांच्यासमोर ठेवण्यात येईल, त्यानंतरच सरकारची भूमिका स्पष्ट केली जाईल. लोकांना डावलून आम्ही पुढे जाणार नाही. सगळ्यांना सोबत घेऊनच हा प्रश्न सोडवू, असे त्यांनी स्पष्ट केले.

नानारमध्ये रिफायनरी प्रकल्प होणार नाही. मात्र, धोपेश्वर येथील लोकांशीही चर्चा केली जाईल. स्थानिक लोकांबरोबर चर्चा करून त्यांचे न्याय हक्क अबाधित राहतील. त्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. हा प्रकल्प कुठेही झाला तरी हरकत नाही. फक्त, विकास झाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. 

Read More