Santosh Deshmukh Murder Case : बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. संतोष देशमुखांच्या छळावेळी आरोपींनी व्हिडीओ कॉल केले होते. छळाचे लाइव्ह व्हिडीओ दाखवण्याचा प्रयत्न आरोपींनी केल्याची धक्कादायक माहिती तसापात समोर आली आहे. या व्हिडीओ कॉलचे सर्व डिटेल्स पोलिसांच्या हाती लागले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नव नविन अपडेट समोर येत आहे. मोकारपंती नावाच्या WhatsApp ग्रुपवर संतोष देशमुख यांच्या छळाचे लाइव्ह व्हिडीओ दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. WhatsApp ग्रुपवर कॉल करणारा आरोपी हा फरार आरोपी कृष्णा आंधळे हाच आहे. कृष्णा आंधळे याने चार वेळा मोकारपंती WhatsApp ग्रुपवर व्हिडीओ कॉल केला होता. मोकारपंती WhatsApp ग्रुपवर देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा होता. याच WhatsApp ग्रुपवर कृष्णा आंधळे व्हिडीओ कॉल करत होता.
पहिला कॉल 9 डिसेंबर रोजी 5 वाजून 14 मिनिटं 44 सेकंदांनी केला. याचे कॉल ड्युरेशन 17 सेकंद होते. दुसरा व्हिडीओ कॉल 5 वाजून 16 मिनिटांनी केलायाचे ही कॉल ड्युरेशन 17 सेकंद होते. तिसरा व्हिडीओ कॉल 5 वाजून 19 मिनिटांनी केला. याचे कॉल ड्युरेशन 2.03 मिनिटं होते. चौथा व्हिडीओ कॉल 5 वाजून 16 मिनिटांनी केला. याचे कॉल ड्युरेशन 2.44 मिनिटांचं होते. आरोपी संतोष देशमुख यांना छळ करत असताना हा सर्व प्रकार लाइव्ह व्हिडीओ कॉलवर दाखवण्याचा प्रयत्न करत होते असा पोलिसांना संशय आहे.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 85 दिवस पूर्ण झाले. मात्र, तरीही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना काही सापडत नाही. कृष्णा आंधळेचा शोध पोलीस, सीआयडीची पथकं घेताहेत. बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले आहे. आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल, असंही पोलिसांनी जाहीर केलंय. मात्र तरीही आंधळेचा पत्ता अद्याप लागला नाही.