Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सारसबागेतील गणेशमूर्तीला पुण्याच्या थंडीचा कडाका

सारसबागेतील बाप्पाचा फोटो व्हायरल 

सारसबागेतील गणेशमूर्तीला पुण्याच्या थंडीचा कडाका

पुणे : सारसबाग पुणे येथील श्री सिद्धिविनायकाला हिवाळ्यात थंडी वाढली की लोकरीचा स्वेटर, कानटोपी घातली जाते. या पोशाखात सिद्धिविनायकाचं रुप फार गोमटं दिसत. पुणेकरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात या लोकरीच्या पोषाखातील गोमट्या सिद्धिविनायकाचं फार आकर्षण आहे.

सारसबाग सिद्धिविनायक मंदिर किंवा तळ्यातला गणपती याला ऐतिहासिक महत्त्व आहे. १७८४ मध्ये सवाई माधवराव पेशव्यानी या मंदिराची स्थापना केली. १८८२मध्ये पहिली मूर्ती बदलून नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना केली.आणि त्यानंतर १९९०साली सध्या असलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

हे जाग्रुत स्थान आहे. हा गणपती नवसाला हमखास पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे, अशी माहिती सारसबागेचे प्रमुख विश्वस्त सुधीर पंडित यांनी दिली आहे.

fallbacks

सध्या महाराष्ट्रातील सर्वात कमी वातावरणाची नोंद पुण्यात आहे. पुण्यात किमान तापमान कमी अंश डिग्री आहे. पुण्यासोबतच नाशिक, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद येथील तापमान खाली गेले आहे.

सारसबाग गणपती हा पुण्यातील पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षण केंद्र आहे. पर्वतीच्या पायथ्याशी सारसबाग गणपती मंदीर आहे. तळ्यातला गणपती अशीदेखील या गणपतीची ओळख आहे. सवाई माधवराव पेशवे यांनी सारसबाग आणि या गणपती मंदिराची स्थापना केली.

fallbacks

पर्वतीवर फिरायला येणारे अनेकजण या मंदिराचे दर्शन घेतात. गणपतीची मूर्ती संगमरवरी आणि उजव्या सोंडेची आहे. माधवरावांना एका स्वारीवर जाताना झालेल्या दृष्टांतानंतर या गणपतीच्या मंदिराची स्थापना करण्यात आली आहे.

Read More