Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Big Breaking : गेटवे ऑफ इंडिया बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू; एलिफंटाकडे जाताना नेव्हीच्या बोटीने दिली धडक

गेटवे ऑफ इंडिया दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. एलिफंटाकडे जाताना बोट उलटली आहे.

Big Breaking : गेटवे ऑफ इंडिया बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू; एलिफंटाकडे जाताना नेव्हीच्या बोटीने दिली धडक

Gateway Of India To Elephanta Boat : गेटवे ऑफ इंडिया दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेटवे ऑफ इंडिया दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. एलिफंटाकडे जाताना बोट उलटली आहे. गेट वे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात ही दुर्घटना घडली आहे. 

मुंबईत गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्राजवळ प्रवासी बोट बुडालीय. नीलकमल नावाची ही बोट गेट वे वरुन एलिफंटाला निघाली होती. त्याचवेळी एका नेव्हीच्या स्पीडबोटनं धडक दिली. या धडकेमुळं बोट बुडाली. दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी नेव्हीच्या बचावनौका दाखल झाल्या. 110 प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. 104 जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.. पण दुर्घटनाग्रस्त बोटीतील 4 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्तवली आहे.  

 

 

 

Read More