Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सीमावाद गंभीर वळणावर; सांगलीत आंदोलन करणाऱ्यांच्या हातात महाराष्ट्राचा नाही तर कर्नाटकचा ध्वज

आंदोलनात सहभागी झालेल्या गावक-यांच्या हातात महाराष्ट्राचा नाही तर कर्नाटकचा ध्वज(flag of Karnataka) होता. यामुळे या आंदोलाबाबतच अनेक प्रश्न उपस्थिते झाले आहेत. 

सीमावाद गंभीर वळणावर; सांगलीत आंदोलन करणाऱ्यांच्या हातात महाराष्ट्राचा नाही तर कर्नाटकचा ध्वज

Maharashtra Karnataka Border Dispute, सांगली :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला(Maharashtra Karnataka Border Dispute) गंभीर वळण लागल्याचं दिसत आहे. महाराष्ट्र सरकारवर नाराज असलेल्या सांगलीच्या(sangali) जत(Jat) तालुक्यातल्या विविध गावात पदयात्रा काढत आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या गावक-यांच्या हातात महाराष्ट्राचा नाही तर कर्नाटकचा ध्वज(flag of Karnataka) होता. यामुळे या आंदोलाबाबतच अनेक प्रश्न उपस्थिते झाले आहेत. 

जत तालुक्यातील उमदी, तिकोंडी, उमराणीपाठोपाठ सिद्धनाथ गावातले गावकरी आक्रमक झाले आहेत. पदयात्रा काढत त्यांनी कर्नाटक सरकारच्या बाजुने घोषणाबाजीही केली. 42 गावांमध्ये पाणी द्या... उच्च शिक्षणाची सोय करा.. अशा विविध मागण्या या गावक-यांनी केल्या आहेत कर्नाटक सरकार त्यांच्या राज्यात शेतक-यांना विविध सुविधा आणि अनुदान देते. पण, म्हैसाळचे पाणी देणार असं सांगत गेल्या 50 वर्षांपासून महाराष्ट्र सरकार फक्त राजकारण करत असल्याचा आरोप गावक-यांनी केला आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या पोलिसांनी संयुक्त बैठक

सीमाप्रश्नावर उद्या बैठक होणार आहे. याआधी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या पोलिसांनी संयुक्त बैठक घेतली आहे. सीमेवर शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पोलीस अधिका-यांची बैठक झाली. सुप्रीम कोर्टात सुनावणीच्या अंतिम टप्प्यात कायदा सुव्यवस्था बिघडू नये याविषयी चर्चा झाली. 

या बैठकीत महाराष्ट्रातून कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिका-यांचा समावेश होता. या बैठकीनंतर आलोक कुमार यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डरवर भेट देऊन इथल्या सुरक्षिततेचा आढावा घेतला. त्याचबरोबर महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या वाहन चालकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केलं. 

 

 

Read More