Raigad Nizampur Grampanchayant Rename : रायगड किल्ला महाराष्ट्राच्या स्वराज्याची राजधानी आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यातील रायगड आहे. रायगड जिल्ह्यात सर्वत्र इतिहासाच्या खाणाखुणा पहायला मिळतात. यामुळे येथील नावांमध्ये देखील ऐतिहासिक संदर्भ पहायला मिळतात. या नावांवरुन वाद देखील होतात. असेच एक वादग्रस्त नाव बदलण्यात आले आहे.
निजामपूर नव्हे तर आता रायगडवाडी म्हणून असे नवे नाव असेल. नावात बदल केल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली. यामुळे आता निजामपूर हे रायगडवाडी नावाने ओळखले जाणार आहे. लवकर नाव बदलण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
रायगडाच्या निजामपूर ग्रामपंचायतीचे नाव बदलले आहे. रायगडमधल्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीच्या नावावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता आक्षेप घेतला. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड ज्या ग्रामपंचायत हददीत येतो त्या ग्रामपंचायतीचं नाव छत्री निजामपूर आहे. ते बदलून रायगडवाडी असं करावं अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केलीय. निजामाच्या खुणा इथं कशाला हव्यात असा सवाल त्यांनी केलाय. दरम्यान पडळकरांच्या या मागणीवर स्थानिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. काहींनी हे नाव बदलण्यात यावे असं म्हटलंय, तर काहींनी या नावामागचा इतिहास लक्षात घ्या,असं म्हणत नावात बदल करायला विरोध दर्शवला.