Maharashtra Politics : कधी नव्हे ते राज्यात नेहमीच उपेक्षित राहणाऱ्या नाशिक जिल्ह्याला एक दोन नव्हे अवघी चार मंत्री पद मिळाली आहेत. अन्न नागरी पुरवठा मंत्री म्हणून छगन भुजबळ यांना आज राज्यपाल भवनात शपथविधी करण्यात आला. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता चार मंत्री झाल्यानं नाशिकचा विकास होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
गेल्या पाच दशकांपासून राज्याच्या राजकारणात आक्रमक नेते म्हणून दबदबा असलेले छगन भुजबळ. महायुतीच्या सरकारमध्ये त्यांच्या ऐवजी नरहरी जिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांना संधी देत त्यांना डावलण्यात आलं. अजित पवार यांनी उचललेल्या या पावलामुळे राजकीय क्षेत्रात मोठा गोंधळ उडाला.
भुजबळ यांनी अजित पवार यांना लक्ष करत टीका केली त्यांच्या कार्यकर्त्यांनी पवारांचे पुतळे ही जाळले. मात्र पुन्हा एकदा त्यांच्यात समेट घडवत धनंजय मुंडे यांच्या जागी त्यांना मंत्रीपद जाहीर करण्यात आल आहे. अजित पवार वादावर पडदा टाकत भुजबळांनी all is well असल्याचं सांगत जणू काही घडलेच नसल्याचं समोर आलं आहे.
कार्यकर्त्यांनी आज अजितदादा एकच वादा घोषणा देत फटाके फोडले. इतकेच नाही तर नाशिकच पालकमंत्रिपद त्यांनाच मिळावं अशीही मागणी त्यांनी केल्याने भुजबळ यांची नवीन इच्छा समोर आलीय. अजित पवार यांच्यासोबतच वाद ही संपुष्टात आल्याचं कार्यकर्ते म्हणत आहेत. आता या वादात नाशिकमध्ये तीन तिघडा काम बिघडा अशी परिस्थिती निर्माण न होता तातडीने निर्णय होणे अपेक्षित आहेत