Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सव्वा नऊ कोटींचा युवराज रेडा ठरलाय आकर्षणाचा विषय

एका रेड्याची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते. लाख-दोन लाख. कोल्हापूरच्या एका प्रदर्शनामध्ये चक्क सव्वा नऊ कोटींचा एक रेडा आकर्षणाचा विषय ठरलाय.

सव्वा नऊ कोटींचा युवराज रेडा ठरलाय आकर्षणाचा विषय

कोल्हापूर : एका रेड्याची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते. लाख-दोन लाख. कोल्हापूरच्या एका प्रदर्शनामध्ये चक्क सव्वा नऊ कोटींचा एक रेडा आकर्षणाचा विषय ठरलाय.

युवराजला पाहण्यासाठी गर्दी

कोल्हापूरच्या भीमा कृषी आणि पशू प्रदर्शनामध्ये युवराज हा रेडा बघण्यासाठी इथं गर्दी झाली आहे. अर्थात, हा रेडा मोठं उत्पन्नही मिळवून देतोय. युवराज वर्षाला ७० ते ८० लाख रुपये कमवून देतो.

यामुळे किंमत 

आता हा युवराज कोण आणि त्याची किंमत ९ कोटी २५ लाख इतकी कशी? असा प्रश्न तुमच्या मनात उपस्थित होणं स्वाभाविक आहे. मात्र, त्याची कमाईही लाखोंच्या घरात आहे. या रेड्याची बडदास्तही तशी ठेवण्यात येत आहे. त्यामुळे त्याचा खर्चही वाढत आहे. त्यामुळे त्याची किंमत कोटीच्या घरात पोहोचलेय.

Read More