Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

भरधाव ट्रकची दारू तस्करांच्या वाहनाला धडक

मेंढा गावानजीक ट्रक-मारुती अल्टो यांच्यात भीषण धडक झाली आहे

भरधाव ट्रकची दारू तस्करांच्या वाहनाला धडक

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूरच्या सिंदेवाही शहराजवळ मेंढा गावानजीक ट्रक-मारुती अल्टो यांच्यात भीषण धडक झाली आहे. यात अल्टोमधील इम्रान पठाण नामक इसमाचा मृत्यू झाला तर राकेश ठाकूर नामक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. अल्टोमधून दारू तस्करी होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळावर बियर कॅन आढळल्याने हा संशय बळावला आहे. जखमींना ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. 

चंद्रपूर जिल्ह्यातील अनिर्बंध दारु तस्करी सुरू असताना आज सिंदेवाही शहराजवळ भरधाव ट्रकने दारू तस्करांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात एक दारू तस्कर ठार तर दुसरा गंभीर जखमी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहराजवळ मेंढा गावालगत महामार्गावर हा अपघात घडला.यात सिंदेवाही येथील अवैध दारू गुन्हे नोंद असलेल्या इमरान खान पठाण याचा जागीच मृत्यू झाला तर सहकारी राकेश ठाकूर याला जखमी अवस्थेत ब्रह्मपुरी च्या ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध दारु तस्करी अपघाताचे मोठे कारण ठरत असताना सिंदेवाही शहराजवळ दारु तस्कर स्वतः अपघाताचे बळी ठरले. अपघातग्रस्त वाहनाच्या आतून बियर बाहेर पडलेल्या आढळून आल्या. बघ्यांनी या वाहनातील अवैध दारू लुटून नेल्याचीही परिसरात चर्चा आहे. दरम्यान सिंदेवाही पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

Read More