Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

उल्हासनगरमध्ये पंखा चोरी करणाऱ्याला बेदम मारहाण

दुकानात चोरी करणाऱ्या एका चोराला उल्हासनगरमध्ये नागरिकांनी चांगलाच चोप दिला.

उल्हासनगरमध्ये पंखा चोरी करणाऱ्याला बेदम मारहाण

उल्हासनगर : दुकानात चोरी करणाऱ्या एका चोराला उल्हासनगरमध्ये नागरिकांनी चांगलाच चोप दिला. उल्हासनगरच्या नेहरू चौकात हा प्रकार घडला. एका दुकानातून पंखा चोरी करताना नागरिकांनी त्याला पकडला. तो पळून जात असताना त्याला अडवून लाथाबुक्क्यांनी तुडवलं. एकाने तर चोराला मारताना त्याच्या डोक्यात फायबरचं टेबलच मारलं. मात्र मारहाण करणाऱ्यांनी या चोराला पोलिसांच्या हवाली न करता सोडून दिलं. 

 

Read More