Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांचा सत्कार होईल, राणा दाम्पत्यांचं कौतूक करत फडणवीसांचा ठाकरेंना टोला

राणा दाम्पत्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांचा सत्कार होईल, राणा दाम्पत्यांचं कौतूक करत फडणवीसांचा ठाकरेंना टोला

मुंबई : हनुमान चालिसा म्हणणा-यांना यापुढं जेलमध्ये जावं लागणार नाही. तर त्यांचा सत्कार होईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणा दाम्पत्याचं कौतुक केलं आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या वतीनं अमरावतीत दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. 

आमच्या सरकारच्या काळात उत्सव धूमधडाक्यात साजरे होतील, असंही त्यांनी सांगितलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि सिने अभिनेता गोविंदा देखील यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यानिमित्तानं रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं.

दुसरीकडे अमरावतीचा पुढील आमदार, खासदार भाजपचाच असेल असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय. त्यामुळे राणा दाम्पत्य भाजपात जाणार की भाजप नवा पर्याय देणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

राणा दाम्पत्यानं आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते, त्यावेळी अमरावतीचा पुढचा खासदार आणि बडनेराचा आमदार भाजपचा असेल असं विधान बावनकुळेंनी केलं. देवेंद्र फडणवीसांनी त्याला दुजोरा दिलाय. 

Read More