Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नवी मुंबईत एकाचवेळी तीन कंपन्यांना मोठी आग

नवी मुंबईत एकाच वेळी तीन केमिकल कंपन्यांना भीषण आग लागली. 

नवी मुंबईत एकाचवेळी तीन कंपन्यांना मोठी आग

नवी मुंबई : एकाच वेळी तीन केमिकल कंपन्यांना भीषण आग लागली. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील आलमा, वैष्णवी आणि नारलबस कंपन्यांना आग लागली आहे. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.

तीन कंपण्यांना लागलेली आग विझविण्यासाठी वाशी, ऐरोली, सीबीडीसह पनवेल अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. नवी मुंबईत एकाच वेळी तीन कंपन्या आगीच्या भक्षस्थानी पडल्याची बहुधा ही पहिलीच घटना असावी. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.

Read More