Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

रस्ता अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू

अहमदनगर-दौंड महामार्गावर चिखली गावाजवळ डंपर आणि स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले. 

रस्ता अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू

अहमदनगर : अहमदनगर-दौंड महामार्गावर चिखली गावाजवळ डंपर आणि स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात झाला. नगरवरुन दौंडकडे जाताना स्विफ्ट गाडी ओव्हर टेक करत असताना डंपरला समोरासमोर धडक होऊन हा अपघात झालाय. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले. 

सागर दहातोंडे, उमेश मोरे आणि अशोक पवार अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं असून हे तीघेही अहमदनगर मधल्या चिचोंडी पाटील इथले रहिवाशी आहेत. दरम्यान डंपर चालक अपघात झाल्यानंतर फरार झाला आहे.

Read More