Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'सरपंच तुला जिवंत सोडणार नाही...', सुदर्शन घुलेने संतोष देशमुखांना दिलेली धमकी, वॉचमनच्या जबाबातून खुलासा

Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तीन वॉचमनचे जबाब  महत्त्वाचे ठरलेत. घटनास्थळावरील वॉचमनचे जबाब झी 24तासच्या हाती    

'सरपंच तुला जिवंत सोडणार नाही...', सुदर्शन घुलेने संतोष देशमुखांना दिलेली धमकी, वॉचमनच्या जबाबातून खुलासा

विकास माने, झी मीडिया

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आवादा एनर्जी प्रकल्पावर वॉचमन म्हणून कार्यरत असणाऱ्या तिघांचा जबाब झी 24 तासच्या हाती लागला आहे. हाच जबाब न्यायालयातदेखील महत्त्वाचा पुरावा ठरला असल्याचे समोर आले होते. या तिघा वॉचमनने जबाबात नेमकं काय म्हटलंय, याची माहिती घेऊयात. 

सरपंच देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी अवादा कंपनी महत्त्वाची ठरली आहे. कारण याच ठिकाणाहून भांडणाची सुरुवात झाली होती. या संपूर्ण घटनेत तीन वॉचमेनचे जबाब महत्त्वाचे ठरले होते. कारण तिन्ही वॉचमेन हे प्रत्यक्षदर्शी आहेत. सरपंच देशमुख यांना मारहाण होताना त्यांनी पाहिलं होतं. आता त्यांचाच जबाब झी 24 तासच्या हाती लागला आहे. या जबाबात संपूर्ण घटनाक्रम नमूद करण्यात आलं आहे. 

'कंपनी बंद करु नका, लोकांना रोजगार मिळू द्यात,' असं सरपंच देशमुख सुदर्शन घुलेना सांगत होते. हे सर्व तिन्ही वॉचमनने जबाबात नमूद केलं आहे. अवादा कंपनीपासूनच या संपूर्ण घटनामक्रमाला सुरुवात झाली होती. त्यामुळं या तिघांचेही जबाब महत्त्वाचे ठरले आहेत. तसंच, सुदर्शन घुले यांने देशमुखांना धमकी दिल्याचेदेखील समोर आले आहे. 

जबाबात काय म्हटलंय?

आवादा एनर्जी प्रकल्पावर तीन वॉचमन कार्यरत होते. या ठिकाणी ड्युटीवर असताना सुदर्शन घुले त्याच्या साथीदारासह आवादा एनर्जी प्रकल्पावर आला.  यावेळी सुदर्शन घुलेने या वॉचमनना मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याने या प्रकरणात अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा देखील नोंदवला.

आवादा एनर्जी प्रकल्पाचे मॅनेजर शिवाजी थोपटे यांना सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराने याच वॉचमन समोर दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली.. ही खंडणी नाही दिली तर कंपनी बंद करा अशी धमकीही दिली होती. हे भांडण सोडवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख या ठिकाणी पोहोचले होते.

कंपनी बंद करू नका.. लोकांना रोजगार मिळू द्या.., असे सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना सरपंच देशमुख म्हणत होते. त्यावेळी सुदर्शन घुलेने सरपंच देशमुख यांना 'सरपंच तुला बघून घेऊ.. तुला जिवंत सोडणार नाही..' अशी धमकी दिली. असा जबाब वॉचमनने दिला आहे. 

Read More